kareena kapoor khan
मुंबई, 4ऑगस्ट : बॉलिवूडचा एखादा नवीन चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असतानाच त्याच्याविषयी नवीन वाद निर्माण होतात. आता बॉलिवूडचा बहुप्रतीक्षित सिनेमा ‘लाल सिंग चड्ढा’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. पण त्यापूर्वीच या चित्रपटातील कलाकारांना टीकेला सामोरे जावे लागत आहे. बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खान बहुप्रतिक्षित ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सध्या ती लाल सिंग चढ्ढाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पण प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. लाल सिंग चढ्ढा चित्रपटातील आमिर खान आणि करीना कपूर खान या दोन्ही कलाकारांवर वेगवेगळ्या कारणांमुळे टीका होत आहे. आमिर खानने काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे बॉयकॉट सध्या ती लाल सिंग चढ्ढा हा ट्रेंड चालू असताना करीना कपूरबाबत एक माहिती समोर आली. आणि तिच्यावरसुद्धा जोरदार टीका होत आहे. पण आता करीनानेच पुढाकार घेत ट्रोल करणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले आहे. करिनावर टीका होण्याचं कारण म्हणजे ती बॉलिवूडमधील आगामी रामायणावर चादरीत असणाऱ्या चित्रपटात सीतेची भूमिका करणार अशी चर्चा सुरु होती. रिपोर्ट्सनुसार, करिनाला सीतेची भूमिका करण्याची ऑफर देण्यात आली होती पण तिने या भूमिकेसाठी 12 कोटी रुपयांची मागणी केली होती अशी माहिती समोर आली. त्यामुळेच करिनावर मोठ्या प्रमाणात टीकेला सुरुवात झाली होती. नेटकऱ्यांनी तिला हिंदूविरोधी म्हटले आहे. आता करिनानं आपण खरचं सीतेची भूमिका करण्यासाठी बारा कोटींची मागणी केली होती का, या प्रश्नावर उत्तर दिले आहे. हेही वाचा - Kangana Ranaut : ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ मागचा मास्टरमाइंड खुद्द आमिरच; कंगनाचं वक्तव्य चर्चेत तिने झूमला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “मला तो चित्रपट कधीच ऑफर झाला नव्हता त्यामागचं कारण मला माहीत नाही. या चित्रपटासाठी माझी निवड कधी केली गेली नव्हती. तसेच ती टीकाकारांना उत्तर देत म्हणाली कि, ‘‘लोकांना आम्हाला बोलायला दररोज काहीतरी विषय हवे असतात. आज 100 प्लॅटफॉर्म आहेत आणि बर्याच गोष्टी सांगितल्या जातात, मग आम्ही आमचे काम करू कि लोकांना स्पष्टीकरण देत बसू.’’
करिनानं एका मुलाखतीतून अभिनेता, अभिनेत्री यांच्या मानधनावरही प्रतिक्रिया दिली आहे करिना म्हणते, ‘‘मानधनातील फरक हा सगळ्यांना माहिती आहे. तो राहिल. मला एवढेच म्हणायचे आहे की, निर्माता आणि दिग्दर्शक यांनी अभिनेत्रींना आदर द्यावा. त्यांचा सन्मान करावा.’’ असं ती म्हणाली आहे. आता या नवीन वादावर करिनाने तिची भूमिका स्पष्ट केली असली तरी बॉयकॉट लाल सिंग चड्ढा हा ट्रेंड तर जोमात चालू आहे. या वादात भर म्हणून करीना आणि आमिरच्या ‘कॉफी विथ करन’ चा टिझर प्रदर्शित झाला आहे. त्या भागात या दोघांनी दिलेल्या उत्तरांची देखील बरीच चर्चा होतेय. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच वादात सापडलेल्या लाल सिंग चड्ढा सिनेमाच्या कमाईवर काही परिणाम होईल कि हा फक्त एक पब्लिसिटी स्टंट आहे हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.