मुंबई, 09 एप्रिल: कंगणा रणौतच्या (Kangana Ranaut show Lock Upp) लॉक अप या शोमध्ये एकीकडे टोकाची भांडणं होत आहेत, तर दुसरीकडे काही कंटेस्टंट्समध्ये प्रेमाचे बंध फुलताना दिसून येत आहेत. सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर अंजली अरोरा (Anjali Arora) आणि कॉमेडियन मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) या दोघांमध्ये काही दिवसांपासून एक स्पेशल बाँड तयार होताना दिसतो आहे. नुकतंच अंजलीने मुनव्वरला आय लव्ह यू (Anjali confessed her love) म्हटल्याचंही समोर आलं आहे; मात्र त्यावर मुनव्वरने दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हे दोन्ही स्पर्धक लॉक अपमध्ये असताना बाहेर सोशल मीडियावर #Munjali देखील ट्रेंड होत आहे. त्या दोघांनी वेळोवेळी ते चांगले मित्र असल्याचे म्हटले आहे. मात्र आता अंजली ‘I Love You’ म्हटल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. लॉकअपच्या एका एपिसोडमध्ये अंजली आणि मुनव्वर एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहेत. त्या वेळी अंजलीने अचानक चादरीत आपले तोंड लपवून मुनव्वरला (Anjali and Munawar) आय लव्ह यू म्हटलं. त्यावर मुनव्वर सुरुवातीला थोडा लाजला; मात्र लगेच त्याने ‘मी तुझ्यासाठी मेंदूचा डॉक्टर बोलावतो’ अशी प्रतिक्रिया गंमतीत दिली. त्यावर अंजलीनेही ‘हो, मला डॉक्टरची गरज आहे’ असं प्रत्युत्तर दिलं. हे वाचा- Taapasee Pannu ला बनायचं आहे ‘मॅडम फायनान्स मिनिस्टर’, काय आहे अभिनेत्रीची ‘मन की बात’? ‘इरिटेट झालोय, पण काय करणार?’ या वेळी गप्पा मारताना अंजली मुनव्वरला म्हणाली, की ‘कित्येक वेळा तू मला वैतागला आहेस असं वाटतं.’ त्या वेळी तिला उत्तर देत मुनव्वर म्हणाला, की ‘शोच्या पहिल्या दिवसापासूनच मी तुला वैतागलो (Munawar irritated by Anjali) होतो. त्यामुळे आता त्यात काही नवीन नाही.’ त्यावर अंजलीने मुनव्वरला विचारलं, की मग आता या प्रॉब्लेमचं काय करायचं? त्यावर मुनव्वर म्हणाला, ‘आता आहे प्रॉब्लेम तर करावं लागेल सहन, करतोच तर आहे, काय करणार?’ यावर अंजली त्याला म्हणते, ‘अजून काही दिवस सहन करावंच लागेल, नाही तर मी मारेन तुला.’ त्यावर मुनव्वर हसून म्हणतो, ‘या जेलमध्ये हिंसा करण्यास मनाई आहे!’
खास अंजलीला भेटायला दिल्लीला नाही जाणार गप्पांमध्ये अंजली मुनव्वरला विचारते, की ‘तू मला भेटायला दिल्लीला येशील का?’ त्यावर मुनव्वर स्पष्टपणे ‘नाही’ म्हणतो. मुनव्वर म्हणतो, ‘मी मुंबईमध्ये राहतो, तू दिल्लीमध्ये. या जेलच्या बाहेर मी खूप बिझी असतो. त्यामुळे दिल्लीला मी खास तुला भेटायला नाही येणार. दिल्लीमध्ये माझा एखादा शो असेल, तर मी तिथे तुला बोलावेन आणि आपण भेटू.’ हे ऐकून अंजली त्याला म्हणते, की ‘मीपण खास तुला भेटायला मुंबईला नाही येणार.’ लव्हबर्ड्स की जस्ट फ्रेंड्स? गेल्या काही दिवसांपासून या दोघांची केमिस्ट्री पाहता इंटरनेटवर या दोघांच्या प्रेमाचे किस्से रंगत आहेत; मात्र या दोघांनीही आपल्यामध्ये केवळ चांगली मैत्री असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे हे दोघे खरंच फक्त मित्र आहेत, की पुढे लव्हबर्ड्स होतील हे लवकरच कळेल.