कमल हासनच्या करिअरसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्याचीही खूपच चर्चा झाली.
मुंबई, 03 जून : साऊथचा तो सुपरस्टार, ज्याने मनोरंजन विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी अशा व्यक्तिरेखा साकारल्या कि त्या आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत. करिअरसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्याचीही खूपच चर्चा झाली. दोन मुलींचा बाप असून, दोन लग्नानंतर तो पुन्हा प्रेमात पडला आणि हे एकदा नव्हे तर तीनदा घडले. लग्नानंतर मुलं, घटस्फोट, आयुष्यातलं सगळं प्रेम मिळवूनही आयुष्याच्या या वळणावर तो आजही एकटाच आहे. आम्ही बोलतोय मेगा स्टार कमल हासनबद्दल. कमल हासन एक उत्कृष्ट अभिनेता तसेच दिग्दर्शक, पटकथा लेखक, निर्माता, पार्श्वगायक आहे. कमल हसनने आपल्या दमदार अभिनयाने लाखो हृदयांवर वेगळी छाप सोडली आहे. त्याने दोनदा लग्न केले. पहिले लग्न यशस्वी झाले नाही, नंतर प्रेमात पडला आणि पुन्हा लग्न केले. या लग्नानंतर दोन मुलींचा जन्म झाला, पण हे लग्नही फार काळ टिकू शकले नाही. 70 च्या दशकात अभिनेत्री श्रीविद्यासोबतच्या त्यांच्या अफेअरचे अनेक किस्से गाजले. दोघांनी एकत्र अनेक चित्रपट केले असले तरी त्यांचे अफेअर फार काळ टिकू शकले नाही. श्रीविद्याने मल्याळम, हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत चित्रपट केले आहेत. चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान श्रीविद्या कमल हासनच्या प्रेमात पडली. परंतु काही कारणांमुळे त्यांचे प्रेम सफल होऊ शकले नाही आणि ते वेगळे झाले.
श्रीविद्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर 1978 मध्ये वयाच्या 24 व्या वर्षी कमल हासनने डान्सर वाणी गणपतीशी लग्न केले. 10 वर्षांच्या लग्नानंतर 1988 मध्ये कमल आणि वाणी यांचा घटस्फोट झाला. यानंतर चित्रपट अभिनेत्री सारिकाने कमलच्या आयुष्यात प्रवेश केला. वाणीसोबतचे लग्न तुटल्यानंतर कमल हसन 1988 पासून सारिकासोबत राहू लागला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कमल हसन जेव्हा सारिकासोबत लिव्ह-इनमध्ये राहत होते, तेव्हा सारिका प्रेग्नंट झाली होती. श्रुती हासनचा जन्म 28 जानेवारी 1986 रोजी झाला. 1988 मध्ये सारिका आणि कमलचे लग्न झाले आणि 1991 मध्ये सारिकाने त्यांची दुसरी मुलगी अक्षराला जन्म दिला. Adipurush : काय सांगता! प्रभासच्या ‘आदिपुरुष’ने रिलीजपूर्वीच कमावले कोट्यवधी; केलाय मोठा विक्रम त्यानंतर कमल आणि सारिकाच्या नात्यात दुरावा आला. याचं कारण होतं सारिकाची मैत्रीण. कमल हासन त्याच्या पत्नीची मैत्रिण गौतमीच्या प्रेमात पडला. गौतमीने एका व्यावसायिकासोबत प्रेमविवाह केला होता. मात्र वर्षभरातच दोघे वेगळे झाले आणि घटस्फोट घेतला. कमलची गौतमीशी जवळीक पाहून सारिकाला तिच्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे याची जाणीव झाली आणि लग्नाच्या 16 वर्षांनंतर म्हणजेच 2004 मध्ये कमल हसन आणि सारिका यांचा घटस्फोट झाला.
घटस्फोटानंतर कमल गौतमीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. 13 वर्षे एकत्र राहिल्यानंतर गौतमीने कमलपासून वेगळे होणार असल्याची घोषणा केली. खरंतर तिने ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. तिने लिहिले होते की ‘मला सांगताना दुःख होत आहे की मिस्टर हासन आणि मी आता एकत्र नाही. जवळपास 13 वर्षे एकत्र राहिल्यानंतर, मी माझ्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक आणि कठीण निर्णय घेत आहे. हा निर्णय घेण्यासाठी मला खूप वेळ लागला, गेल्या काही वर्षांत मी हे दुःखद सत्य स्वीकारले आणि आज हा निर्णय घेऊ शकले.’ असं तिने लिहिलं होतं.कमल हासनच नाव आता त्याच्यापेक्षा 22 वर्षांनी लहान अभिनेत्री सिमरन बग्गासोबतही नाव जोडले गेले. ३ लग्न आणि अफेअरनंतरही कमल हासन आयुष्यात आजही एकटाच आहे.