JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘कभी खुशी कभी गम’मधील ‘POO’ बॉलिवूडमधून गायब, सांगितलं चकित करणारं कारण

‘कभी खुशी कभी गम’मधील ‘POO’ बॉलिवूडमधून गायब, सांगितलं चकित करणारं कारण

वयाच्या 11 व्या वर्षी तिनं केलेल्या अभिनयाची अनेकांनी स्तुती केली होती. तिला यासाठी सर्वोत्कृष्ट बाल अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 27 जून**:** मनोरंजनसृष्टीत असे अनेक कलाकार होऊन गेले ज्यांनी लहान असतानाच लोकप्रियतेच शिखर गाठलं. पण पुढे त्यांना म्हणावं तसं यश मिळालं नाही. अभिनेत्री माल्विका राज (Malvika Raaj) ही देखील अशाच दुदैवी बालकलाकारांपैकी एक आहे. तिनं करण जोहरच्या कभी खुशी कभी गम (Kabhi Khushi Kabhie Gham) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पहिल्याच चित्रपटात तिला करीना कपूरच्या बालपणीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. यामध्ये तिनं पूजा ही व्यक्तिरेखा साकारली होती. वयाच्या 11 व्या वर्षी तिनं केलेल्या अभिनयाची अनेकांनी स्तुती केली होती. तिला यासाठी सर्वोत्कृष्ट बाल अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला होता. मसाबा गुप्ताचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; वजन कमी करण्यासाठी दिल्या 5 टिप्स पुढे जाऊन माल्विका एक लोकप्रिय अभिनेत्री होणार अशी भविष्यवाणी खुद्द करण जोहरनं देखील केली होती. परंतु त्याची ही भविष्यवाणी खोटी ठरली. कारण पुजा अर्थात पूनं पुढे बॉलिवूडमध्ये काम केलंच नाही. खरं तिला अनेक बिग बजेट चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या होत्या. काही मालिकांनी देखील मुख्य भूमिका देऊ केल्या होत्या. परंतु तिनं त्या सर्व ऑफर धुडकावल्या. कारण तिनं अभिनय करु नये अशी तिच्या आई-वडिलांची इच्छा होती. RD Burman Birth Anniversary: आर.डी बर्मन यांना ‘पंचम दा’ का म्हणतात? माल्विकानं हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी तिनं त्या मागचं कारण सांगितलं. ती म्हणाली, “करिअर सुरु झालं तेव्हा मी केवळ 11 वर्षांचे होते. त्यामुळं मी केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं अशी माझ्या आई-वडिलांची इच्छा होती. कारण चित्रपटांमुळं माझं शिक्षण व्यवस्थित होणार नाही अशी भीती त्यांना वाटत होती. परिणामी शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मी बॉलिवूडपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. सध्या मी काही चित्रपटांसाठी ऑडिशन दिलं आहे. जर सिलेक्ट झाले तर पुन्हा एकदा मी पुनरागमन करु शकेन”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या