JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Javed Akhtar: जावेद अख्तर यांना रुचलं नाही कंगनानं केलेलं कौतुक; म्हणाले 'मी तिला फार महत्त्व...'

Javed Akhtar: जावेद अख्तर यांना रुचलं नाही कंगनानं केलेलं कौतुक; म्हणाले 'मी तिला फार महत्त्व...'

एरवी जावेद अख्तर यांच्यावर निशाणा साधणाऱ्या कंगनानं चक्क त्यांचं कौतुक केलं. आता यावर जावेद अख्तर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

जाहिरात

जावेद अख्तर-कंगना रणौत

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 फेब्रुवारी: प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर सध्या पाकिस्तानात दिलेल्या आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. नुकतंच लाहोरमध्ये ‘फैज फेस्टिवल २०२३’ या कार्यक्रमात जावेद अख्तर सहभागी झाले होते. या दरम्यान पाकिस्तान मध्ये बसून  त्यांनी 26/11 हल्ल्यावरून पाकिस्तानला लक्ष्य केले.  जावेद अख्तर यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यांच्या वक्तव्याचं सगळीकडेच कौतुक होत आहे. पण सगळ्यात जास्त लक्ष वेधलं ते कंगना रानौत ने केलेल्या कौतुकानं. एरवी जावेद अख्तर यांच्यावर निशाणा साधणाऱ्या कंगनानं हा व्हिडीओ पाहून चक्क त्यांचं कौतुक केलं. आता यावर जावेद अख्तर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. पाकिस्तानातील लाहोर येथे झालेल्या या कार्यक्रमातून जावेद अख्तर परतले असून त्यांनी येथे भारतात  येऊन नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. या मुलाखतीदरम्यान त्यांना कंगना रानौतच्या प्रतिक्रियेबद्दल प्रश्न विचारण्यात आला, परंतु त्यांनी त्या प्रश्नास उत्तर देण्यास टाळाटाळ केली.  पण पुन्हा त्याबद्दलच विचारले असता त्यांनी ‘कंगनाच्या कौतुकाने मला काही फरक पडत नाही.’ असं मत व्यक्त केलं. हेही वाचा - दुःखात आकंठ बुडालेल्या रेखा यांची वाईट झालेली अवस्था; म्हणाल्या ‘तेव्हा मी दारू प्यायचे, ड्रग्स…’ कंगनाविषयी बोलताना जावेद अख्तर म्हणाले कि, ‘कंगनाच्या कौतुकाने मला काही फरक पडत नाही. काही दिवसांत ती पुन्हा जुन्या झोनमध्ये परत येईल. काळजी करू नका हे काही काळासाठीच आहे. खरं तर मी कंगनाला फार महत्त्व देत नाही. त्यामुळे तिने तिच्या वक्तव्यालाही महत्त्वाचं समजत नाही. ती बोलली ते विसरून जा आणि पुढे चला.’ जावेद अख्तर यांनी कंगनावर दिलेल्या या प्रतिक्रियेची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जावेद अख्तर पाकिस्तानात म्हणाले होते कि, ‘‘आपण एकमेकांना दोष देणं थांबवलं पाहिजे, त्यामुळे कोणतीही समस्या सुटणार नाही. एकूणच सध्या जे वातावरण तापलं आहे ते कमी व्हायला पाहिजे. आम्ही मुंबईकर आहोत, आम्ही पाहिलं आहे तेव्हा मुंबईवर कशापद्धतीने हल्ला झाला होता. ती लोकं नॉर्वे किंवा इजिप्तमधून आलेले नव्हते. ही लोक अजूनही तुमच्या देशात मोकळे फिरत आहेत आणि ही खदखद एखाद्या भारतीयाच्या मनात असेल तर त्याचं तुम्ही वाईट वाटून घ्यायला नको’’ यावर प्रतिक्रिया देताना कंगनाने ‘जेव्हा मी जावेद साहेबांच्या कविता ऐकते तेव्हा असं वाटतं की कशी सरस्वती मातेने यांच्यावर एवढी कृपा केली आहे. पण पाहा काहीतरी प्रामाणिकपणा असतोच माणसात. जय हिंद जावेद अख्तर साहेब. घरात घुसून मारलात.’ अशी प्रतिक्रिया दिली होती.

दरम्यान काही वर्षांपूर्वी जावेद अख्तर आणि कंगना रानौत  चर्चेत आले होते, जेव्हा जावेद अख्तर यांनी कंगनाच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यामुळेच आता कंगनाने त्यांचं कटुक केलेलं पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या