JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Janhvi Kapoor : भक्तिरंगात रंगली जान्हवी कपूर; तिरुमला मंदिरात पूजा करून मागितला 'हा' आशीर्वाद

Janhvi Kapoor : भक्तिरंगात रंगली जान्हवी कपूर; तिरुमला मंदिरात पूजा करून मागितला 'हा' आशीर्वाद

जान्हवी कपूरनं नुकतंच ज्युनियर एनटीआरसोबत एनटीआर ३० या चित्रपटाचे शूटिंग देखील सुरू केलं आहे. तत्पूर्वी जान्हवीने नुकतंच भारतातल्या प्रसिद्ध मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आहे.

जाहिरात

जान्हवी कपूर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 03 एप्रिल:  बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या व्यावसायिक आयुष्यासोबतच आपल्या खाजगी आयुष्यामुळेही प्रचंड चर्चेत असते. ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांची लेक असणाऱ्या जान्हवीने आपल्या अभिनयाच्या जोरावर आपला चाहतावर्ग निर्माण केला आहे .बॉलिवूडमधील लोकप्रिय स्टारकिड असलेल्या जान्हवीने इंडस्ट्रीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. जान्हवीनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. गुंजन सक्सेना, घोस्ट स्टोरीज, मिली, रूही यांसारख्या चित्रपटांमध्ये जान्हवीनं काम केलं आहे. जान्हवीचा दोस्ताना-2, तख्त हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तत्पूर्वी जान्हवीने नुकतंच भारतातल्या प्रसिद्ध मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आहे. जान्हवी कपूरचा देवावर आणि पूजेवर खूप विश्वास आहे. ती नेहमीच मंदिरात जाऊन देवाचे आशीर्वाद घेताना दिसते. आता जान्हवी आंध्र प्रदेशातील तिरुमाला मंदिरात पोहोचली आहे. तिरुमाला मंदिरात जान्हवीने तिरुपती बालाजीसमोर डोकं ठेऊन आशीर्वाद घेतले आहेत. यावेळी जान्हवीसोबत तिची बहिण ख़ुशी कपूर देखील होती. जान्हवीचा दर्शनादरम्यानचा व्हिडीओ आता समोर आला आहे. Indian Idol 13 Winner: ‘या’ गायकाने पटकावलं इंडियन आयडॉल 13 चं विजेतेपद; आलिशान कारसह जिंकली इतकी रक्कम मंदिरात दर्शनादरम्यान जान्हवी फक्त दक्षिण भारतीय अवतारात दिसली. व्हीआयपी दर्शनादरम्यान ती मंदिरासमोर जमिनीवर डोके टेकवून बसलेली दिसली. जान्हवीच्या मंदिरात दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जान्हवी मंदिरात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी  ती तिची दिवंगत आई श्रीदेवी यांच्या वाढदिवसानिमित्त तेथे पोहोचली होती. जान्हवी कपूरही सारा अली खानसोबत केदारनाथ मंदिरात दर्शनासाठी गेली होती. जिथे बर्फाळ मैदानात दोघीनी खूप मजा केली आणि पूजा केली. यादरम्यान सारा आणि जान्हवीही भोलेनाथच्या रंगात रंगलेल्या दिसल्या. जान्हवीचा हा भक्ती अंदाज तिच्या चाहत्यांना खूप आवडतो.

संबंधित बातम्या

वर्कफ्रंटवर जान्हवी येणाऱ्या काळात ज्युनियर एनटीआर NTR30 चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून झळकणार आहे. जान्हवी कपूरच्या वाढदिवशी, NTR30 च्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर जान्हवी कपूरचा लूक रिलीज करत ही घोषणा केली होती. एवढंच नाही तर जान्हवी कपूरने नुकतेच ज्युनियर एनटीआरसोबत एनटीआर ३० या चित्रपटाचे शूटिंग देखील सुरू केले आहे. हा चित्रपट 5 एप्रिल 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.  रिपोर्ट्सनुसार, जान्हवी कपूरला या चित्रपटासाठी 3.5 कोटी रुपये मिळणार आहेत.

गेल्या पाच वर्षांत जान्हवीने बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली असली तरी तिचे सिनेमे मात्र बॉक्स ऑफिसवर फारशी जादू दाखवू शकलेले नाहीत. जान्हवीचे बहुतेक सिनेमे फ्लॉप झाले आहेत. अशातच जान्हवीने तिरुपती मंदिरात दर्शन घेऊन येणाऱ्या काळात यश मिळावे म्हणून प्रार्थना केली असावी असं चाहते म्हणत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या