JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / माधुरी दीक्षित- जॅकी श्रॉफ यांनी रिक्रिएट केलं 100 Days मधील ते गाणं, रोमॅंटिक नंबरवर चाहत्यांकडून कमेंटचा पाऊस

माधुरी दीक्षित- जॅकी श्रॉफ यांनी रिक्रिएट केलं 100 Days मधील ते गाणं, रोमॅंटिक नंबरवर चाहत्यांकडून कमेंटचा पाऊस

90 च्या दशकात जॅकी श्रॉफ आणि माधुरी दीक्षितची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर आग लावायची. 100 Days या सिनेमातील एका गाण्यावर या जोडीनं नुकतचं एक रील केलं आहे. सध्या या रीलवर कमेंटचा वर्षाव होत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 मार्च - धकधक गर्ल माधुरी दीक्षित ( madhuri dixits )सध्या तिच्या ‘द फेम गेम’ या वेब सीरीजमुळे चांगलीच चर्चेत आहे. नेटफ्लिक्सवर ही वेबसीरीज नुकतीच स्ट्रीम झाली आहे. माधुरीरी डान्स रील्समुळे नेहमी चर्चेत असते. आता तिनं नुकतचं जॅकी श्रॉफ यांच्यासोबत**(jackie shroff and madhuri dixits )** एक रोमॅंटिक डान्स रील केले आहे. सोशल मीडियावर हे रील प्रचंड व्हायरल होत आहे 90 च्या दशकात जॅकी श्रॉफ आणि माधुरी दीक्षितची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर आग लावायची. 100 Days या सिनेमातील सुन बेलिया, शुक्रिया मेहरबानी, तू कहे तो नाम तेरे कर दूं सारी जवानी…हे गाणं आजही लोकांना त्या काळात घेऊन जाते. हे गाणं जॅकी श्रॉफ आणि माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रीत केले होते. आता माधुरी आणि जॅकी श्रॉफ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रील्सच्या माध्यमातून त्यांनी हे गाणं पुन्हा रिक्रिेयेट करण्याचा प्रयत्न केला आहे.जॅकी श्रॉफ आणि माधुरीची केमिस्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांना वेड लावलं आहे. वाचा- ‘पर लोग मुझे गिराने मे कई बार गिरे…’ मानसी नाईकची पोस्ट नेमक कुणासाठी? माधुरीनं शेअर केलेल्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे. माधुरीसोबच जॅकी यांनी देखील त्यांच्या सोशल मीडियावर हे रील शेअर केले आहे. सध्या या दोघांचा हा रोमॅंटिक अंदाज चाहत्यांना देखील आवडला आहे. अनेकांनी कमेंट करच ओल्ड़ इज गोल्ड म्हणजे जुनं ते सोन असं म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

द फेम गेम या सीरीजमध्ये जॅकी यांनी माधुरीसोबत एक डान्स नंबर केला आहे. सध्या हा डान्स नंबर चर्चेत असतानाच त्याचं हे नवीन रील देखील चांगलेच चर्चेत आलं आहे. माधुरीनं जॅकी श्रॉफ यांच्यासोबत अनेक सिनेमात काम केले आहे. त्यांना पुन्हा एकत्र पाहून चाहत्यांना देखील आनंद झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या