JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / OMG! सोनाक्षी सिन्हाने केला साखरपुडा? 'मिस्ट्री बॉय'सह पोस्ट केले हातात रिंग घातलेले Photos

OMG! सोनाक्षी सिन्हाने केला साखरपुडा? 'मिस्ट्री बॉय'सह पोस्ट केले हातात रिंग घातलेले Photos

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Is Sonakshi Sinha Engaged) देखील आता या रांगेत येऊन उभी राहिली आहे की काय असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. कारणही तसंच आहे. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामुळे तिने साखरपुडा केला का असा सवाल चाहते विचारत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 09 मे: सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहू लागले आहे. विकी-कतरिनापासून रणबीर-आलियापर्यंत गेल्या काही महिन्यात बी-टाउनमधील अनेक कपल्सनी लग्नगाठ बांधली आहे. दरम्यान अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Is Sonakshi Sinha Engaged) देखील आता या रांगेत येऊन उभी राहिली आहे की काय असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. कारणही तसंच आहे. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामुळे तिने साखरपुडा केला का असा सवाल चाहते विचारत आहेत. तिने हातात डायमंड रिंग फ्लाँट (Sonakshi Sinha Flaunting Diamond Ring) करत फोटो शेअर केला आहे. त्यामुळे असा अंदाज वर्तवला जात आहे की तिने साखरपुडा केला आहे. या फोटोमध्ये एक मिस्ट्री बॉय (Sonakshi Sinha Mystery Boy) देखील आहे. ज्याच्या खांद्यावर हात ठेवून, हातात हात घेत काही फोटोज अभिनेत्रीने शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्यावरील आनंद अजिबात लपत नाही आहे. दरम्यान या फोटोंमध्ये ‘मिस्ट्री बॉय’चा चेहरा मात्र दिसत नाही आहे. हे वाचा- ‘प्रचंड अभिमान’, Dharmaveer चे आशियातील सर्वात मोठे होर्डिंग; प्रसाद ओकने शेअर केला VIDEO अभिनेत्रीने यावेळी तीन वेगवेगळ्या पोस्ट शेअर केल्या आहेत. ज्यामध्ये ती या मिस्ट्री बॉयसह पोज देताना दिसते आहे. तिने या फोटोंना सारखंच कॅप्शन दिलं आहे. यावेळी सोनाक्षीने असं म्हटलं आहे की, ‘माझ्यासाठी BIG DAY. माझ्या सर्वात मोठ्या स्वप्नांपैकी एक पूर्ण होत आहे. तुमच्याशी शेअर करण्यासाठी आणखी प्रतीक्षा नाही करायची आहे. विश्वासच बसत नाही आहे की हे इतकं EZI आहे.’

संबंधित बातम्या

जाहिरात

काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचा सलमान खानसह साखरपुडा केल्याचा फोटो व्हायरल झाला होता. तो फोटो एडिट करण्यात आला होता हे काहीच वेळात समोर आलं होतं. दरम्यान आता अभिनेत्रीने रिंग फ्लाँट करताना फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे आता ती लवकरच लग्नबेडीत अडकणार का असा सवाल चाहत्यांना पडला आहे. अभिनेत्रीचे नाव गेल्या काही वर्षांपासून झहीर इकबाल या तरुणाशी जोडले जाते. दोघे अनेक वर्षांपासून डेट करत असल्याच्याही चर्चा आहेत. झहीरच्या वाढदिवशी देखील अभिनेत्रीने खास पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे आता हा मिस्ट्री बॉय झहीर इकबाल आहे का याबाबत चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या