अभिषेक बच्चन
मुंबई 16 जुलै : मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा लेक अभिषेक नेहमीच चर्चेत असतो. एअरपोर्टवर पत्नी आणि मुलगी आराध्या सोबत तो नेहमीच स्पॉट होतो. एवढंच नाही तर सोशल मीडियावर देखील अभिषेकचं तुफान फॅन फॉलोईंग आहे. अभिषेक आपल्या चित्रपटांची निवड खूप बारकाईनं करतो. त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट होत नसले तरी समीक्षक त्याच्या अभिनयाचं कौतुक करतात. आता अभिनयात हात अजमावल्यानंतर अभिषेक देखील आपल्या आई वडिलांप्रमाणे राजकारणात एंट्री घेणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून रंगल्या आहेत. नेमकं काय आहे त्यामागचं सत्य जाणून घ्या. नुकतंच समोर आलेल्या काही रिपोर्टनुसार, अमिताभ आणि जया बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन आपल्या आई वडिलांप्रमाणे अभिनयानंतर राजकारणात आपले नशीब आजमावू शकतो. अभिनेत्री जया बच्चन या 2004 पासून समाजवादी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार आहेत. त्या अनेकदा सरकारवर निशाणा साधताना दिसतात. आता आईच्या मागेच अभिषेक देखील समाजवादी पक्षात प्रवेश करणार अशी माहिती समोर आली होती. मात्र आता या बातम्यांचं सत्य समोर आले आहे.
‘ई-टाइम्स’ ने दिलेल्या वृत्तानुसार, अभिषेक बच्चन राजकीय प्रवेश करणार नाहीये. त्याच्याविषयी समोर आलेली ही माहिती पूर्णपणे खोटी असल्याचे सूत्रांनी सांगितले. अभिषेक बच्चनचा राजकीय प्रवेश या केवळ अफवा आहेत, असं सांगण्यात येत आहे. ‘अन् रक्ताची चिळकांडीच उडाली’कोल्हापूरात शुटींग सुरू असताना रवींद्र महाजनी यांच्यासोबत घडला होता भयंकर प्रकार खरं तर, रविवारी अभिषेक बच्चन अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात सामील होऊ शकतो अशी बातमी समोर आली होती. तो 2023 मध्ये अलाहाबाद मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवू शकतो असं म्हटलं गेलं. पण, आता अभिषेक बच्चनशी संबंधित सूत्रांनी हे वृत्त खोटं असल्याचं म्हटलं आहे. अभिषेक बच्चनने 2013 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत राजकारणात प्रवेश करण्याबद्दल भाष्य केलं होतं. त्याला वडिलांप्रमाणे निवडणूक लढवता येईल का, असं विचारले होतं. तेव्हा अभिषेकने, ‘पडद्यावर राजकारण्याची भूमिका नक्कीच साकारू शकतो पण राजकारणात कधीच प्रवेश करणार नाही.’ असं थेट उत्तर दिलं होतं.
अभिषेक बच्चन यांचे वडील अमिताभ बच्चन यांनी अभिनयातून ब्रेक घेत 1984 मध्ये राजकारणात नशीब आजमावले. त्यानंतर राजीव गांधींच्या सांगण्यावरून त्यांनी अलाहाबादमधून लोकसभा निवडणूक लढवली. मात्र कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच बिग बींनी राजीनामा दिला होता. त्याचबरोबर अभिषेक बच्चनची आई आणि अभिनेत्री जया बच्चन या समाजवादी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार आहेत. पण आता अभिषेक राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चाना पूर्णविराम लागला आहे.