मुंबई, 15 जुलै- प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र हनुमंत महाजनी यांच निधन झालं आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्तानं मनोरंजन विश्व हादरून गेलं आहे. मावळच्या तळेगाव दाभाडील आंबी येथील घरात शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला. रवींद्र यांचं वय 77 वर्ष होतं. त्यांचा मृत्यू साधारण: तीन दिवसांपूर्वी झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रविंद्र महाजनी यांनी मराठीसह हिंदी, गुजराती सिनेमांमध्येही काम केलं आहे. रविंद्र महाजनी यांनी व्ही. शांताराम यांच्या झुंज या सिनेमातून कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी ‘लक्ष्मी’, ‘दुनिया करी सलाम’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’ यांसारख्या सिनेमात काम केलं. इतकंच नाही तर बॉलिवूडमध्येही ते झळकले आहेत.. मात्र त्यांचा रवींद्र महाजनी ‘सतीची पुण्याई’ हा चित्रपट खूप चर्चेत आला होता. या चित्रपटाच्या सेटवर रवींद्र महाजनी हे गंभीर जखमी झाले होते . तळेगावमधील 311 नंबरचा ‘तो’ फ्लॅट; मृत्यूच्या 2 दिवस आधी महाजनींसोबत काय घडलं? ‘सतीची पुण्याई’ या चित्रपटाची शुटिंग कोल्हापूरात सुरु होती. यात रवींद्र महाजनी यांच्यासोबत आशा काळे, निळू फुले, लीला गांधी यांच्यासारखे कलाकार देखील होते. या चित्रपटातील दरोडेखोरांसोबत हाणामारीचा सीन शुट करणं रवींद्र महाजनी यांना खूप महागात पडलं. बेड अस्ताव्यस्त, चेहरा काळा,2 दिवस मृतदेह पडून, महाजनींचा शेवटचा भयंकर फोटो समोर सतीची पुण्या चित्रपटातील हा सीन शूट करताना दरोडेखोर बनलेल्या कलाकारांच्या हातात नकली नाही तर खऱ्या कुऱ्हाडी देण्यात आल्या होत्या.हा सीन खरा दिसावा असा काहीसा प्रयत्न दिग्दर्शकाचा असावा मात्र खऱ्याखुऱ्या कुऱ्हाडीसोबत शुटिंग करण्याची कल्पना रवींद्र महाजनी यांना मुळीच आवडली नाही.अशाप्रकारे शुटिंग करणं हे धोक्याचं ठरु शकतं असं वारंवार सांगण्याचा प्रयत्नही रवींद्र यांनी केला मात्र चित्रपटाच्या शुटिंग टिम त्याकडे लक्ष दिलं नाही अन् रवींद्र महाजनी यांना ज्यांची भिती होती तेच घडलं.
सीन शुट करण्यास सुरुवात झाली तेव्हा दरोडेखोराची भूमिका साकरणाऱ्या एका कलाकाराच्या हातातल्या कुऱ्हाडीचा वार रवींद्र महाजनी यांच्याच हाताला लागला. जे व्हायला नको होतं तेचं घडलं. कुऱ्हाड खरी असल्यानं हा घाव इतका जोरात होता की, रवींद्र महाजनी यांच्या हातातून रक्ताची चिळकांडीच उडाली. संपूर्ण सेटवर रक्त पसरले होते. या सीनबद्दल रवींद्र महाजनी जेव्हाही सांगितलं त्यावेळी ते स्वत: शहारायचे. रिपोर्ट आल्यानंतर महाजनी यांचं पार्थिव त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्त करण्यात येईल. यांच्या पार्थिवावर काही वेळातच पुणे वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.