JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘दु:खात आनंद शोधायचे माझे बाबा’; मुलानं शेअर केला इरफान खानचा हृदयस्पर्शी फोटो

‘दु:खात आनंद शोधायचे माझे बाबा’; मुलानं शेअर केला इरफान खानचा हृदयस्पर्शी फोटो

इरफानचा मुलगा बाबील देखील आपल्या वडिलांच्या आठवणीनं भावुक झाला आहे. (Irrfan Khan emotional photo) त्यानं एक हृदयस्पर्शी फोटो शेअर करुन वडिलांच्या स्वभावाचं वर्णन केलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 29 एप्रिल**:** इरफान खान (Irrfan Khan) हा भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जायचा. 29 एप्रिल 2020 साली कर्करोगामुळं त्याचं निधन झालं. आज त्याची पहिली पुण्यतिथी आहे. या निमित्तानं जगभरातील चाहत्यांनी त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे. इरफानचा मुलगा बाबील देखील आपल्या वडिलांच्या आठवणीनं भावुक झाला आहे. (Irrfan Khan emotional photo) त्यानं एक हृदयस्पर्शी फोटो शेअर करुन वडिलांच्या स्वभावाचं वर्णन केलं आहे.

Irrfan Khan Death Anniversary; पाहा अष्टपैलू अभिनेत्याचे कधीही न पाहिलेले फोटो बाबीलनं आपल्या इन्स्टाग्रामवर इरफानचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो मोडलेलं टेबल दुरुस्त करताना दिसत आहे. किमो थेरेपी तुम्हाला आतून जाळून टाकते. त्यामुळं तुम्ही इतर गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करता. तुम्ही स्वत:साठी टेबल बनवायचा. स्वत:चे जर्नल्स स्वत: लिहायचा. तुमच्या प्रत्येक कामात एक पवित्रता होती. तुमची जागा दुसरं कोणी कधी घेऊ शकणार नाही. अशा आशयाची भावुक कॉमेंट त्यानं या फोटोवर केली आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

इरफान खान भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जायचा. जवळपास 30 वर्षांच्या करिअरमध्ये इरफानने 50 हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं. बॉलिवूडसोबतच त्याने हॉलिवूडमध्येही छाप सोडली. कलाक्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीसाठी 2011 मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या