JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / International Yoga Day 2019 : योग करण्याचा मोह इनायाला आवरेना, पाहा सोहा अली खानच्या लेकीचे फोटो

International Yoga Day 2019 : योग करण्याचा मोह इनायाला आवरेना, पाहा सोहा अली खानच्या लेकीचे फोटो

International Yoga Day 2019 : इनायाचे हे क्यूट फोटो बाबा कुणाल खेमूनं त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21जून : जागतिक योग दिन आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यात बॉलिवूडचे सेलिब्रिटी सुद्धा मागे नाहीत. पण अशातच अभिनेत्री सोहा अली खानची लेक इनायाचे योग करतानाचे काही क्यूट फोटो समोर आले आहेत. जागतिक योग दिनाच्या निमित्तानं इनाया सुद्धा तिच्या आजीसोबत योग करताना दिसली. इनायाचे हे क्यूट फोटो बाबा कुणाल खेमूनं त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले. बॉलिवूड अभिनेत्रींचं फिटनेस सिक्रेट, परफेक्ट फिगरसाठी करतात या खास गोष्टी कुणाल खेमूनं आपल्या लेकीचे तिच्या आजीसोबत योगासनं करताना काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात लहानगी इनाया आजीच्या समोर बसून योगासनं करताना दिसत आहे. हे फोटो शेअर करताना कुणालनं, ‘आजोबाच्या मार्गदर्शनाखाली लहानगी इनाया आजीकडून योगासनं शिकत आहे. जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा.’ असं कॅप्शन दिलं आहे. कुणालच्या या फोटोवर अनेक बॉलिवूड कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. याशिवाय चाहत्यांकडूनही इनायाच्या निरागसतेच कौतुक होत आहे. Bigg Boss Marathi च्या घरातून अभिजीत बिचुकलेला अटक

काही दिवसांपूर्वी इनायानं बाबा कुणाल खेमूला त्याच्या वाढदिवसाला खास बर्थ डे साँग म्हणत आणि पियानो वाजवत त्याला विश केलं होतं. हा व्हिडिओ सुद्धा कुणालनं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता आणि माझ्या वाढदिवसाची सर्वोत्तम भेटवस्तू असं कॅप्शन दिलं होतं. याशिवाय इनाया अनेकदा आपला भाऊ तैमुर अली खानसोबत खेळताना दिसते. तैमुर एवढीच इनाया सुद्धा सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. प्रियांकाच्या लग्नात बूट चोरल्यानंतर निकने परिणीतीला दिले लाखो रुपये आणि…

=========================================================== VIDEO: योग फिव्हर! डॉग स्क्वॉडने केलेल्या ह्या कवायती तुम्ही पाहिल्या का?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या