मुंबई, 13 जुलै: झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ मालिका गेले अनेक दिवस रंजक वळण पाहायला मिळत होतं. इंद्रा आणि दीपू त्यांच्या प्रेमाची परीक्षा देत होते. इंद्रा गुंड असल्याचं समजताच देशपांडे सरांनी दोघांच्या लग्नाला विरोध केला होता. मात्र इंद्रा दीपूच्या प्रेमापुढे त्यांनाही हार मानावी लागली आहे. कारण अखेर देशपांडे सरांना इंद्रा आणि दीपूच्या प्रेमाची जाणीव होणार असून ते दोघांच्या प्रेमाचा स्वीकार करणार आहेत. ( Man Udu Udu Jhala Indra Deepu Wedding) मालिकेच्या येत्या भागामध्ये इंद्रा दीपू आणि देशपांडे सरांचा एक भावूक पण आनंदाचा क्षण पाहायला मिळणार आहे. देशपांडे सरांनी इंद्राला त्याची योग्यता दाखवून देण्यासाठी एक संधी दिली होती. त्याप्रमाणे इंद्रानं वसुलीचा धंदा सोडून तो कार्तिकच्या कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून नोकरी करू लागला होता. इकडे जयश्रीला देखील त्याचा मुलगा चांगलं काम करतोय याची जाणीव व्हायला सुरुवात झाली होती. दीपूच्या प्रेमासाठी वाटेल ते करणाऱ्या इंद्राचे कष्ट सगळेच पाहत आहेत. इंद्राच्या या खडतर प्रवासत दीपूनं त्याला भक्कम साथ दिली आणि अखेर दोघांनी त्यांच्या प्रेमाची लढाई जिंकली आहे. हेही वाचा - Sonali Patil: ‘परी म्हणू की…’; सोनाली पाटीलचं रूप पाहून ‘हा’ अभिनेताही झाला लट्टू
मालिकेचा एक प्रोमो प्रदर्शित झाला असून त्यात दाखवण्यात आल्याप्रमाणे, इंद्रा देशपांडेच्या घरी येतो. तेव्हा देशपांडे त्यांच्या भावना व्यक्त करतात. ते म्हणतात, ‘मला तुमचं प्रेम कधी समजलंच नाही. साळगावकर मला माफ करा’. त्यावर इंद्रा त्यांना, ‘सर गुरूंनी कधीच माफी मागायची नसते, तर गुरुंनी फक्त आशिर्वाद द्यायचा असतो. सर आज मी जो काही तो तुमच्यामुळे’, असं म्हणतो. इंद्राच्या या वाक्यानंतर देशपांडे सर भावूक होऊन दोघांना मिठी मारुन भावना व्यक्त करतात. तिघांचा हा भावूक क्षण पाहून प्रेक्षकांच्याही डोळ्यात पाणी येणार आहे. इंद्रा दीपूच्या लग्नाच्या सीनसह मन मन उडू उडू झालं ही मालिका चांगल्या नोटवर प्रेक्षाकांचा निरोप घेणार आहे. मालिका सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांनी मालिकेला प्रचंड प्रेम दिलं. मात्र तरीही टीआरपीच्या शर्यतीत मालिका हवं तसं यश मिळवू शकली नाही. परंतू इंद्रा आणि दीपच्या चाहत्यांची गणना कोणत्याच मालिकेच्या कलाकारांशी करता येणार नाही. त्यामुळेच आता मालिका संपणार असल्याचं कळताच चाहते मात्र चांगलेच भावूक झाले असून मालिका बंद करू नका अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे. तर काही चाहत्यांनी मालिकेचे शेवटचे भाग पाहण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे.