JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Indian Idol फेम अंजली गायकवाडवर फसवणुकीचा आरोप, काय आहे नेमकं प्रकरण?

Indian Idol फेम अंजली गायकवाडवर फसवणुकीचा आरोप, काय आहे नेमकं प्रकरण?

‘इंडियन आयडॉल 12’ ( Indian Idol 12) फेम अंजली गायकवाडच्या ( anjali gaikwad ) अडचणीत सापडणार असल्याचे चित्र निर्माण झालं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 एप्रिल- ‘इंडियन आयडॉल 12’ ( Indian Idol 12) फेम अंजली गायकवाडच्या ( anjali gaikwad ) अडचणीत सापडणार असल्याचे चित्र निर्माण झालं आहे. कारण तिच्यावर इन्स्टाग्रामवरील एका लोकप्रिय इन्फ्लुएंसरनं फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. यावर इंफ्लुएंसरचे म्हणणे आहे की, अंजलीने त्याचे इन्स्टा अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे अंजलीच्या ( Anjali gaikwad Indian Idol age ) या सगळ्या प्रकारवर म्हणणे आहे की, तिचे स्वतःचे इन्स्टाग्राम अकाउंट 2 एप्रिल रोजी हॅक (Anjali Gaikwad cheating case ) झाले आहे. या सगळ्या प्रकारामुले अंजलीचे नाव सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे. या घडलेल्या प्रकारवर अंजलीनं माध्यमांशी बोलताना सांगितले की, माझे इन्स्टा अकाउंट 20-21 दिवसांपूर्वी हॅक झाले आहे. या बदल्यात हॅकरनं तिच्याकडून 70 हजार रुपयांची मागणी करत आहे. तिनं यावेळी असं देखील सांगितलं की, या प्रकरणाची सायबर क्राईममध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र परंतु अद्याप त्यांच्याकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. वाचा- World Book Day 2022:‘आई कुठे काय करते’ फेम अरुंधती सध्या वाचतेय ‘ही’ पुस्तके अंजलीवर आरोप करणाऱ्या इन्फ्लुएंसरनं त्याच्या ट्विटर हँडलवर काही स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. याला कॅप्शन देखील दिली आहे. त्याच्याकडून अंजलीवर आरोप लावण्यात आला आहे की, इंस्टाग्रामवरील तिच्या व्हेरिफाईड अकाउंटद्वारे अंजली लोकांची फसवणूक करते. स्क्रीनशॉट्सनुसार, अंजलीच्या पीआर टीममधील काही लोकांनी आधी तिच्याशी संपर्क साधला आणि नंतर तिचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या