JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Happy Birthday:'किराणा दुकानात काम ते प्रसिद्ध लेखक' पाहा रस्किन बॉन्ड यांचा प्रेरणादायी प्रवास..

Happy Birthday:'किराणा दुकानात काम ते प्रसिद्ध लेखक' पाहा रस्किन बॉन्ड यांचा प्रेरणादायी प्रवास..

इंग्रजी भाषेतील प्रसिद्ध भारतीय लेखक (Indian Writer) म्हणून रस्किन बॉन्ड (Ruskin Bond) यांना ओळखले जाते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 मे-  इंग्रजी भाषेतील प्रसिद्ध भारतीय लेखक (Indian Writer)  म्हणून रस्किन बॉन्ड (Ruskin Bond) यांना ओळखले जाते. आज पर्यंत त्यांनी अनेक साहित्यांसाठी विविध पुरस्कार मिळविले आहेत. त्यांच्या साहित्या बद्दल तर सर्वांनाचं माहिती आहे. मात्र फारच कमी लोक आहेत, ज्यांना त्यांच्या खाजगी आयुष्याची माहिती आहे. आज रस्किन बॉन्ड तब्बल 87 वर्षांचे(87 Birthday) झाले आहेत. त्यानिमित्ताने आपण त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया. रस्किन बॉन्ड हे एक ब्रिटीश वंशाचे भरतीत लेखक आहेत. 19 मे 1934 ला त्यांचा जन्म हिमाचल प्रदेश मधील कसौली या ठिकाणी झाला आहे. त्यांच्या वडिलांचं नाव अब्रे बॉन्ड आणि आईचं नाव एरीथ क्लार्क असं होतं. तसेच त्यांना एक बहीण आणि भाऊसुद्धा होते. त्यांचं नाव इलन बॉन्ड आणि विल्यम बॉन्ड असं होतं.

संबंधित बातम्या

रस्किन बॉन्ड यांच्या बालवयातचं त्यांच्या वडिलांचं मलेरियानं निधन झालं होतं. त्यांचं बालपण विविध शहरात गेलं आहे. डेहराडून, शिमला, जामनगर, मसुरी अशा विविध शहरात ते वास्तव्यास होते. काही काळ त्यांनी एका धर्मशाळेत शिक्षण घेतलं होतं. मात्र त्यांनतर त्यांच्या आईने त्यांना शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवलं होतं. इंग्लंडमध्ये राहून त्यांनी उदरनिर्वाहासाठी कधी एका किरणा दुकानात तर कधी एका स्टुडीओमध्ये सुद्धा काम केलं आहे. काम करत असताना त्यांनी एक पुस्तक देखील लिहिलं होतं. ‘द रूम ऑन द रुफ’ असं त्या पुस्तकाचं नाव आहे. (हे वाचा: ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम शिवांगी जोशी जगते अलिशान आयुष्य, पाहा PHOTO   ) काही काळानंतर ते भारतात परत आले. ते आपल्या कुटुंबांसोबत डेहराडूनमध्येच राहतात. त्यांनी बालचमूं साठी अनेक साहित्यांची निर्मिती केली आहे. ‘द ब्ल्यू अम्ब्रेला’ हे त्यांचं अतिशय प्रसिद्ध असं पुस्तक आहे. त्याचबरोबर त्यांनी लहान मुलांसाठी अन्ग्री रिव्हर, द ग्रेट स्टोरीज फॉर चिल्ड्रेन अशी अनेक पुस्तके लिहिली आहेत. (हे वाचा: मला ‘Corona Vaccine’ हवीये मात्र डॉक्टर देत नाहीत; दिया मिर्झानं व्यक्त केली खंत ) इतकचं नव्हे तर रस्किन बॉन्ड यांच्या पुस्तकावरून हिंदीत चित्रपट सुद्धा तयार झाले आहेत. जुनून आणि सात खून माफ हे चित्रपट त्यांच्याच पुस्तकांवर आधारित आहेत. त्यांच्या अष्टपैलू कलागुणांचा आढावा घेत भारतीय सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कारसुद्धा प्रधान केला आहे. अशा या हरहुन्नरी लेखकाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या