मुंबई, 6 मे- सोनी टीव्हीवरील ‘कौन बनेगा करोडपती’ या रिअलिटी शोच्या 11 व्या सीझनच्या रजिस्ट्रेशनला 1 मेपासून सुरुवात झाली. प्रश्न उत्तरांच्या फेरीत निवडणुकांचा फिवरही पाहायला मिळत आहे. दररोज रात्री 9 वाजता अमिताभ बच्चन एक प्रश्न विचारतात आणि त्याचे चार पर्यायही देतात. या प्रश्नांची उत्तरं देऊन तुम्ही केबीसीसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात. 5 मे रोजी बच्चन यांनी रजिस्ट्रेशनसाठी पाचवा प्रश्न विचारला. हा प्रश्न होता, ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ सिनेमात मेजर शेरगिल जेव्हा ‘हाउ इज द जोश’ हा प्रश्न विचारतो तेव्हा त्याची टीम त्याला काय उत्तर देते? अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडली, चाहत्यांना भेटलेच नाहीत A- जबरदस्त सर B- एकदम झक्कास C- रेडी सर D- हाय सर जर मी भगवी साडी नेसले तर मी ‘साध्वी स्वरा भास्कर’ होईन का? या प्रश्नानंतर केबीसीवरही निवडणुकांचा प्रभाव झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. शिवाय निवडणुकांच्या काळात सरकारला पाठिंबा देत सर्जिकल स्ट्राइकच्या मुद्यावर प्रेक्षकांचं लक्ष नेण्याचं प्लॅनिंग केलं जात आहे. आता या मागचं खरं कारण काय हे तर कोणीच सांगू शकत नाही. सामान्यज्ञानाशी निगडीत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये या प्रश्नाची खरंच गरज होती का हाच मुद्दा प्रामुख्याने उपस्थित केला जात आहे. नेटफ्लिक्सचा हा शो पाहून 12 वर्षाच्या मुलीने केली आत्महत्या तुम्हीही करू शकता नोंदणी- सोनी टीव्हीने केबीसीमध्ये कसं रजिस्ट्रेशन करायचं याबद्दल सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून सांगितलं आहे. ‘आता तुमच्यात आणि हॉट सीनमध्ये कोणतंही अंतर नसेल. हा आहे नोंदणीसाठीचा पहिला प्रश्न. नोंदणी करण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह.’ या प्रश्नांची योग्य उत्तरं जर तुम्हाला येत असतील तर तुम्ही एसएमएसमार्फत तसेच सोनी लिव्ह अप्लिकेशन ही सर्व उत्तरं देऊ शकतात. …म्हणून प्रियांका चोप्राच्या भावाचं लग्न मोडलं VIDEO: उर्मिलानंतर राजकारणात एण्ट्री करणार? प्रिया बापट म्हणते…