मुंबई 26 जुलै: हृता दुर्गुळे ही अभिनेत्री सध्या तुफान बॅटिंग करताना दिसत आहे. एकामागे एक येणाऱ्या धमाकेदार कलाकृतींनी हृताचं वेळापत्रक सध्या बरंच व्यस्त आहे. हृता येत्या आठवड्यात टाईमपास 3 या सिनेमात बघायला मिळणार आहे. या सिनेमाच्या प्रोसेसमध्ये तिला एकदा अपमान शान करावा लागला अशी माहिती समोर येत आहे. टाईमपास 3 सिनेमाची टीम नुकतीच एका मुलाखतीच्या दरम्यान एकत्र जमली होती. तेव्हा हृतासोबत काम करायचा अनुभव सांगताना कलाकारांनी तिच्यासोबत घडलेला हा किस्सा शेअर केला. हृतासोबत घडलेला (hruta durgule timepass 3) किस्सा मनमित पेम या कलाकाराने सांगितला आहे. तो असं म्हणतो, “हृताशी आम्ही खूपच चांगलं वागलो आहोत. पण आमच्या टीममधल्या जयेशने हृताशी बोलताना पहिल्याच वाक्यात नकळत पटकन तिचा अपमान केला. आम्ही सगळे साई तुझं लेकरू गाण्याबद्दल चर्चा करत होतो. आणि हृता त्या गाण्याचा भाग नसणार होती. त्यामुळे ती बोलून गेली की अरेरे मी त्यामध्ये नाहीये. तेव्हा जयेश पटकन बोलून गेला, ‘हं मग मजा येईल’. त्याचं हे हृतासोबत झालेलं पहिलं संभाषण होतं आणि त्याने अशी काही गुगली फेकली की सगळेच चकित झाले. आणि हृताचा चेहरा सुद्धा बघण्यासारखा झाला.” मनमितने हा मजेदार किस्सा शेअर केल्यावर हृताने सुद्धा यावर आपलं मत मांडलं. अगदी हलक्या फुलक्या वातावरणात या टीमने शूटिंग केल्याचं या मुलाखतीत समोर आलं आहे.
भलेही पहिल्या संभाषणात हृताला काहीसा मजेशीर पण विचित्र अनुभव आला असला तरी तो मनावर न घेता तिने प्रोसेस अगदी हसत खेळत एन्जॉय केल्याचं समजत आहे. या टीममध्ये हृता ही नवीन मेम्बर या सिनेमाच्या निमित्ताने जॉईन झाली होती. **हे ही वाचा-** Lalit Prabhakar: चि व चि.सौ.का सिनेमाची जोडी पुन्हा एकत्र; ललितने केली नव्या सिनेमाची घोषणा त्यामुळे टाईमपास च्या टीमला एक नवी ‘पालवी’ फुटली अशी प्रतिक्रिया सुद्धा या टीमने दिल्याचं समोर आलं आहे. जुन्या टाईमपासच्या टीमचं दडपण न घेता हृताने सुद्धा धमाल काम केल्याचं ट्रेलरमध्ये समोर आलं आहे. दगडू परब आणि पालवी पाटील यांची ही धमाल लव्हस्टोरी बघायला प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.