मुंबई 14 जून: अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) म्हणजे चाहत्यांची लाडकी दिपू मालिकेत जरी हॉस्पिटलमध्ये असली तरी खऱ्या आयुष्यात मात्र हृता सध्या बरीच चर्चेत आहे. आधी लग्न (Hruta Durgule wedding) मग हनिमून आणि लागोपाठ झालेल्या चित्रपटांच्या घोषणांमुळे हृता सध्या प्रचंड आनंदात आहे. आता तिच्या आनंदात भर पडणारी अजून एक कोरीकरकरतीत आनंदाची बातमी आपल्यासमोर आली आहे. हृता दुर्गुळे हे नाव आता अभिनय क्षेत्रात नवं राहिलेलं नाही. हृता तिच्या क्युटनेस मुळे जेवढी प्रसिद्ध आहे तेवढीच तिच्या अभिनयासाठी शुद्ध आहे. महाराष्ट्राची क्रश असणाऱ्या हृता दुर्गुळेचा नवा चित्रपट ‘अनन्या’ (Ananya Marathi Movie) लवकरच चित्रपटगृहात भेटीला येणार आहे. या चित्रपटाची पहिली झलक आज समोर आली असून त्या टीजरची बरीच चर्चा होताना दिसत आहे. ‘अनन्या’ हा अत्यंत वेगळ्या धाटणीचा विषय असणारा चित्रपट 22 जुलै रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. कोणताही अडथळा आला तरी स्वप्नांच्या आकाशात स्वच्छंदी भरारी घेणारी ही अनन्या देशमुख नक्की कोण आहे तिची गोष्ट नक्की काय आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं चित्रपट पाहून मिळताच पण या चित्रपटाचा हा एक हॅपनिंग टीजर प्रेक्षकांना फारच आवडला आहे.
एका मोठ्या कठीण प्रसंगातून स्वतःला बाहेर काढत जगणाऱ्या अनन्याला पाहायला सगळेच आतुर झाले आहेत. आजवर फक्त हृताचा आवाज आणि पुसटशी ओळख देणारा एक टीजर प्रदर्शित झाला होता. मात्र या नव्या आणि गोडं टीजरने मात्र अनन्याच्या आयुष्यात नेमकं काय घडणार ही उत्सुकता वाढवली आहे. हे ही वाचा- राज ठाकरेंच्या वाढदिवसाला केदार शिंदेंची दोन शब्दाची पोस्ट ठरतेय लक्षवेधी, काय आहे त्यात खास? यामध्ये हृता एकदम वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. हृता एकाच वेळी सध्या विविधांगी भूमिकांमध्ये दिसत आहे. ‘दादा एक गुड न्यूज आहे’ नाटका मधील मन्या, ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील दिपू तर आता ‘अनन्या’चित्रपटातील अनन्या देशमुख हे पात्र अशा अनेक शेड्स असलेल्या भूमिकांमधून ती आपल्या भेटीला येत आहे. या वेगळ्या भूमिकेचं आणि हृताच्या अभिनय कौशल्याचं बरच कौतुक होत आहे. हृता येत्या काळात ‘टाईमपास 3’ चित्रपटात सुद्धा एका डॅशिंग भूमिकेत दिसणार आहे.