JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Hrithik Roshan: सिड-कियारा नंतर आता हृतिक-सबाची बारी! अभिनेत्याच्या लग्नाबाबत समोर आली मोठी अपडेट

Hrithik Roshan: सिड-कियारा नंतर आता हृतिक-सबाची बारी! अभिनेत्याच्या लग्नाबाबत समोर आली मोठी अपडेट

हृतिक रोशन आणि सबा आझाद या दोघांची नेहमीच चर्चा होते. आता या जोडप्याबाबत नुकतीच मोठी अपडेट समोर येत आहे.

जाहिरात

हृतिक रोशन - सबा आझाद

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 03 मार्च:  बॉलीवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन त्याच्या किलर लूक आणि दमदार अभिनयामुळे करोडो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. अभिनेता हृतिक रोशन त्याच्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. सध्या तो अभिनेत्री सबा आझादला डेट करत आहे. दोघेही एकमेकांबद्दल खुलेपणाने प्रेम व्यक्त करतात तर कधी ते हातात हात घालून फिरायला जातात. या दोघांची नेहमीच चर्चा होते. आता या जोडप्याबाबत नुकतीच मोठी अपडेट समोर येत आहे. हृतिक रोशन आणि सबा आझाद हे या वर्षाच्या अखेरीस लग्नबंधनात अडकणार असल्याची बातमी समोर येत आहे. यांच्या लग्नाच्या बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र, या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तसेच हृतिक आणि सबानेही या प्रकरणावर मौन सोडलेले नाही. गेल्या वर्षी दोघांच्या लग्नाची बातमी आली होती. वास्तविक, असे सांगितले जात होते की 2023 मध्ये हृतिक रोशन आणि सबा आझाद यांचे लग्न होऊ शकते, ज्यामध्ये फक्त कुटुंब आणि खास मित्र सहभागी होतील. Deepika Padukone Oscars: ऑस्करच्या सोहळ्यात दीपिका पदुकोणला मिळाली मोठी जबाबदारी; अभिनेत्रीचं होतंय कौतुक हृतिक रोशनची मैत्रीण आणि सबा आझाद यांनी हळुहळू अभिनेत्याच्या कुटुंबामध्येही स्थान निर्माण केले आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर हृतिकच्या आई-वडिलांनीच नाही तर त्याच्या दोन मुलांनीही सबा आझादला आपलं मानलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सबा आझाद आणि हृतिक रोशन अनेकदा सुझैन खान आणि अर्सलान गोनीसोबत पार्टी करताना दिसतात.

संबंधित बातम्या

हृतिक रोशन आणि सबा आझाद यांची भेट ट्विटरच्या माध्यमातून झाली होती. यावेळी दोघांमध्ये छान बोलणं झालं आणि त्यानंतर हृतिकने सबाला डिनरसाठी बोलावलं.  दोघांत आधी मैत्री झाली आणि त्याचं रूपांतर प्रेमात झालं. या दोघांचे अनेक चाहते असले तरी अभिनेत्याला अनेकदा ट्रोल देखील केलं जातं. हृतिकच्या खाजगी आयुष्याबद्दल सांगायचं तर  20 डिसेंबर 2000 रोजी त्याने सुझान खानशी लग्न केले होते. दोघांना रिदान आणि रेहान ही दोन मुले आहेत. 2013 मध्ये हृतिक आणि सुझैन वेगळे झाले आणि 2014 मध्ये घटस्फोट घेतला. मात्र, दोघेही नेहमीच मित्र म्हणून एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले आणि मुलांचे संगोपन करत आहेत. सुझैन सध्या अर्सलान गोनीला डेट करत आहे तर, हृतिक सबा आझादला डेट  करत आहे.

हृतिक रोशनच्या वर्क फ्रंट विषयी सांगायचं तर  हृतिक रोशन पुढे अनिल कपूर आणि दीपिका पदुकोण सोबत ‘फाइटर’ मध्ये दिसणार आहे. दीपिका आणि हृतिक पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. हे दोन्ही स्टार्स बॉलीवूडमधील नंबर वन कलाकारांपैकी एक आहेत. त्यामुळेच  या दोघांना पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहतेही खूप उत्सुक आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या