मुंबई 19 जुलै: हेमांगी कवी (hemangi kavi instagram) ही अभिनेत्री सध्या संजय जाधव यांच्या तमाशा live सिनेमात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. हा सिनेमा पत्रकारिता विश्वातील अनेक गोष्टींवर भाष्य करणारा आणि वास्तव दाखवणारा आहे अशी प्रतिक्रिया सध्या समोर येत आहे. याचसोबत प्रमोशनदरम्यान हेमांगीने केलेला एक व्हिडिओसुद्धा बराच viral होत आहे. हेमांगीने RJ स्मितासोबत एक धमाल रील बनवलं असून तिच्या या व्हिडिओवर सध्या बऱ्याच प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. यामध्ये हेमांगीला विचारणा होते की रेडिओ आणि न्यूजपेपर मध्ये काय फरक आहे तर हेमांगी सांगते रेडिओमध्ये पराठे गुंडाळून देऊ शकत नाही. अनेक घरांमध्ये वर्तमानपत्राचा वापर पोळ्या, पराठे गुंडाळून देण्यासाठी होतो त्याच धर्तीवर केलेल्या या विनोदाचं खूप कौतुक होताना दिसत आहे. तसंच पत्रकारितेच्या विषयावर आधारित सिनेमात काम करणाऱ्या हेमांगीने असं भन्नाट उत्तर दिलेलं पाहून तर अक्षरशः हसू रोखणं चाहत्यांसाठी अवघड झालं आहे. हेमांगी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिचे धमाल रिल्स बघायला चाहत्यांना बरीच मजा येते आणि ती धमाल ते एन्जॉय करताना दिसतात. हेमांगी संजय जाधव यांच्या सिनेमात एका वेगळ्या भूमिकेत दिसून येत आहे. तिच्यासोबत सिद्धार्थ जाधव सुद्धा सूत्रधाराच्या भूमिकेत दिसून येत आहे.
संजय जाधव यांच्या या म्यूजिकल सिनेमात हेमांगी सुद्धा वेगवेगळ्या अंदाजात संगीताच्या साथीने कथानक पुढे नेताना दिसून येत आहे. सिनेमातील तिची भूमिका खूप लोकप्रिय होत असून तिच्या कामाचंही कौतुक होत आहे. याशिवाय वर्क फ्रंटवर हेमांगी मालिकेत सुद्धा दिसून येत आहे. हे ही वाचा- Kishori Shahane: बापरे! किशोरी शहाणेंच्या भुवयांना हे काय झालं? भाषाही ओळखू येईना, पाहा VIDEO हेमांगी कायमच आपली मतं ठामपणे मांडताना दिसते. कधी काही महत्त्वाच्या विषयायांवर ती भाष्य करताना सुद्धा दिसते. यावरून तिला कधी ट्रोल केलं जातं तर कधी तिला उत्तम प्रतिसाद मिळतो. सध्या हेमांगीच्या या भन्नाट व्हिडिओची हवा होताना दिसत आहे.