हिरामंडी
मुंबई, 18 फेब्रुवारी: ‘गंगूबाई काठियावाडी’नंतर आता बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी वेब सीरिजच्या दुनियेत पाऊल ठेवणार आहेत. आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असलेला त्यांचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट प्रचंड गाजला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने दमदार यश मिळवलं सोबतच अनेक पुरस्कार देखील जिंकले. आता चित्रपटसृष्टीतील यशानंतर निर्माते, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी वेब सीरिजच्या दुनियेत पाऊल ठेवणार आहेत. लवकरच ते त्यांची ‘हीरामंडी’ ही वेब सिरीज घेऊन येत आहेत. नुकताच त्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हीरामंडी’ या वेब सिरीजचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, संजीदा शेख आणि शर्मीन सेगल रॉयल लूकमध्ये दिसत आहेत. या लूकनेच सर्वांना वेड लावले असून सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू झाली आहे. हेही वाचा - Aai Kuthe Kay Karte: ‘पुन्हा तीच चूक…’ आशुतोष सोबत लग्न होण्याआधी संजनाने अरुंधतीला दिला ‘हा’ सल्ला हीरामंडीच्या फर्स्ट लूक व्हिडीओमध्ये सोनाक्षी सिन्हासह सर्व अभिनेत्री रॉयल अवतारात दिसत आहेत. व्हिडीओच्या सुरुवातीला संजय लीला भन्साळी यांचं नाव दिसतं. त्यानंतर मनीषा कोइराला, अदिति राव हैदरी, शर्मिन सेगहल, रिचा चड्ढा, संजीदा शेख आणि अखेरीस सोनाक्षी सिन्हाची झलक दिसते. सर्व अभिनेत्री पिवळ्या रंगाच्या रॉयल आउटफिट्समध्ये लक्ष वेधून घेत आहेत. सर्वजण पिवळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये रॉयल लूकमध्ये दिसत आहेत. लवकरच ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
‘हीरामंडी’चा फर्स्ट लूक व्हिडिओ त्या काळची झलक देतो जिथे ‘वेश्या’ ‘राणी’ असायच्या. हे शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘अनदर टाईम, दुसरे युग, संजय लीला भन्साळी यांनी तयार केलेले आणखी एक जादूई जग, ज्याचा भाग होण्यासाठी आपण प्रतीक्षा करू शकत नाही. हिरामंडीच्या सुंदर आणि मनोरंजक जगाची येथे एक झलक आहे. लवकरच येत आहे!’ हिरामंडी हे लाहोरमधील एका क्षेत्राचे नाव आहे जे मुघल काळात वेश्यांचे राहण्याचे ठिकाण म्हणून ओळखले जात होते.
दरम्यान संजय लीला भन्साळी पहिल्यांदा वेब सीरिजचं दिग्दर्शक करत आहेत. ‘गंगूबाई काठियावाडी’नंतर ते ‘हीरामंडी’तून देहविक्री करणाऱ्या स्त्रियांची कथा मोठ्या पडद्यावर मांडताना दिसणार आहेत. मात्र ही वेब सीरिज कधी प्रदर्शित होणार याबाबत कोणतीही माहिती अद्याप शेअर करण्यात आलेली नाही.