JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'मुलुख माझा, हुकुम माझा, भाषा पण माझीच'; राज ठाकरेंच्या दमदार आवाजात 'हर हर महादेव'चा टीझर प्रदर्शित

'मुलुख माझा, हुकुम माझा, भाषा पण माझीच'; राज ठाकरेंच्या दमदार आवाजात 'हर हर महादेव'चा टीझर प्रदर्शित

‘मुलुख माझा, हुकुम माझा, भाषा पण माझीच’ असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दमदार आवाजात हर हर महादेव या सिनेमाचा टीझर आज दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे.

जाहिरात

हर हर महादेव टीझर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 05 ऑक्टोबर : यंदाची दिवाळी प्रेक्षकांसाठी खास असणार आहे. यंदाच्या दिवाळीत जगभरात ‘हर हर महादेव’ चे तोरण सजलेलं पाहायला मिळणार आहे. हर हर महादेव हा सिनेमा एकाच दिवशी तब्बल पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय इतिहासातील अनन्य साधारण व्यक्तिमत्व बाजीप्रभूंवर चित्रीत करण्यात आलेला ‘हर हर महादेव’ हा सिनेमा येत्या दिवाळीत २५ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याआधी सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली आहे आणि ती ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाजात. राज ठाकरे यांच्या दमदार आवाजातील हर हर महादेव या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. राज ठाकरे यांच्या मनसे अधिकृत या पेजवरून सिनेमाचा टीझर शेअर करण्यात आला आहे. हर हर महादेव या सिनेमाच्या टीझरमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असलेला अभिनेता सुबोध भावेचा दमदार अभिनय पाहायला मिळत आहे. सिनेमाची दमदार गाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्व रसिकप्रेक्षकांची या गाण्यांना उत्तम दाद मिळत असताना या सिनेमाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. दमदार कलाकार आणि जबरदस्त गाणी असलेल्या आणि राज ठाकरे यांच्या आवाजातील टीझरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. टीझर पाहून प्रेक्षकांची सिनेमाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे. हेही वाचा - Har Har Mahadev : अजय पुरकर नंतर आता बाजीप्रभू देशपांडे साकारणार ‘हा’ दमदार अभिनेता; तुम्ही ओळखलं का?

मराठी चित्रपटसृष्टीत नेहमीच नवनवीन प्रयोग होत राहिले आहेत. यंदा याआधी कधीच न झालेला असा प्रयोग ‘हर हर महादेव’ या चित्रपटाद्वारे करण्यात आला असून हा सिनेमा फक्त मराठीतच नाही तर पाच भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सुलतानी अंधार पसरलेला असताना मा जिजाऊंनी स्वातंत्र्यतेचे पाहिलेले स्वप्न, बारा हजार शत्रूंवर विजय मिळवणारे आपले तीनशे मावळे आणि बाजीप्रभूंच्या रणझुंजार कर्तृत्वावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. दिवाळी आणि भारतीय ऐतिहासिक संस्कृती यांचे एक वेगळंच नातं आहे.

‘हर हर महादेव’ सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केलं आहे. तर सिनेमाची निर्मिती सुनील फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग अँड फ्रेंड्स’ची आहे. सुबोध भावे, शरद केळकर ,अमृता खानविलकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा सकारात्मकतेची, शौर्याची, देश प्रेमाची ज्योत पेटवणार यात काही शंकाच नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या