राणी मुखर्जी
मुंबई, 21 मार्च : बॉलिवूडची दमदार अभिनेत्री राणी मुखर्जी सध्या चर्चेत आहे. राणी मुखर्जी आता अगदी मोजक्याच चित्रपटांमध्ये दिसते, पण ती ज्याही चित्रपटात काम करते, त्यावर प्रेक्षक फिदा होतात. प्रेक्षक तिच्या अभिनयाचं तोंडभरून कौतुक करतात. राणी मुखर्जीचा ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. राणी मुखर्जीच्या दमदार अभिनयाची सर्वत्र चर्चा आहे. राणी मुखर्जीने पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत दबदबा निर्माण केला आहे. राणी मुखर्जी तिच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असते,पण तिचं वैयक्तिक आयुष्य देखील चाहत्यांसाठी नेहमीच चर्चेचा विषय ठरलं आहे. आज राणी मुखर्जी आपला 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्या निमित्ताने तिच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी जाणून घ्या. 2014 मध्ये राणी मुखर्जीने प्रसिद्ध निर्माते आदित्य चोप्रासोबत इटलीमध्ये गुपचूप लग्न केले होते. मात्र, लग्नाआधी राणीचे नाव अनेक अभिनेत्यांशी जोडले गेले होते, ज्यापैकी बहुतेक जण विवाहित होते. राणीवर अनेकवेळा अभिनेत्यांची घरे फोडल्याचा आरोपही झाला होता. यामध्ये तिच्या गोविंदा सोबतच्या अफेअरची चर्चा सर्वात जास्त रंगली होती. गोविंदासोबत तिने हद कर दी आपने या चित्रपटात काम केले होते. 2000 च्या सुमारास या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही जवळ आले असे म्हटले जाते. Salman Khan: धमकीनंतर सलमान खानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; म्हणाला ‘जेव्हा जे व्हायचंय ते होईलच…’ मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोविंदाने राणीला त्यावेळी एक सो एक भेटवस्तू दिल्या होत्या. त्यानंतर गोविंदाने राणीचे अनेक निर्मात्यांना सुचवायला सुरुवात केली कारण गोविंदा त्यावेळी मोठा स्टार होता तर राणीने नुकतंच चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर बऱ्याचदा दोघे एकत्र दिसू लागले. पण त्यावेळी गोविंदा विवाहित होतो आणि त्यांच्या राणीसोबतच्या अफेअरची बातमी बायकोपर्यंत पोहचायला वेळ लागला नाही. गोविंदाची पत्नी सुनीता हिला हे कळताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली पण गोविंदा राणीपासून दूर जायला तयार नव्हता. गोविंदाच्या अफेअरमुळे नाराज झाल्याने सुनीता यांनी घर सोडले होते आणि ती हॉटेलमध्ये राहू लागली होती. अफेअरमुळे घर उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर असताना गोविंदाने राणी सोबतचं नातं कायमचं संपवण्याचा निर्णय घेतला.
खूप समजावून सांगितल्यानंतर सुनीता राजी झाली आणि घरी परतली, त्यानंतर तिने गोविंदाला शपथ दिली की ती राणीसोबत पुन्हा कोणत्याही चित्रपटात काम करणार नाही. एका मुलाखतीत राणीने गोविंदाचे कौतुक करताना सांगितले होते की, ‘या इंडस्ट्रीत त्याच्यासारखा मित्र मिळणे कठीण आहे. मला फक्त हे माहित आहे की तो माझा खूप चांगला मित्र आहे, परंतु त्याच्याशी अफेअरच्या चर्चा रंगलेली मी पहिली अभिनेत्री नाही. नीलम, रवीना टंडन, प्रीती झिंटा, फराह नाज, करिश्मा कपूर आणि त्याच्यासोबत काम केलेल्या कोणत्याही अभिनेत्रीसोबत त्याचे नाव जोडले जाते.’ असं म्हणत राणीने त्यांच्या नात्यावर स्पष्टीकरण दिले होते.