JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / HBD Pankaj Tripathi: कधी एका खोलीत राहायचे त्रिपाठी, आज या बॉलिवूड स्टार्सचे आहेत शेजारी

HBD Pankaj Tripathi: कधी एका खोलीत राहायचे त्रिपाठी, आज या बॉलिवूड स्टार्सचे आहेत शेजारी

पंकज यांचा प्रवास काही सोपा नव्हता. अनेक अडथळ्यांना सामोरं जात त्यांनी पल्ला गाठला आहे. पंकज त्रिपाठी यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्यांच्याविषयी खस गोष्टी.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 5 सप्टेंबर : बॉलिवूडमधील काही गुणी अभिनेत्यांमध्ये जर समावेश असलेले अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) आज एक स्टार देखील आहेत. आपल्या मेहनतीने त्यांनी हे स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे देशभरातच नाही तर देशाबाहेर देखील त्यांचे लाखो चाहते आहेत. पण पंकज यांचा हा प्रवास काही सोपा नव्हता. अनेक अडथळ्यांना सामोरं जात त्यांनी पल्ला गाठला आहे. पंकज त्रिपाठी यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्यांच्याविषयी खस गोष्टी. पंकज त्रिपाठी चित्रपटांत तर अनेक वर्षांपासूनच काम करत आहेत. मात्र मागील वर्षांपासून त्यांना मोठी ओळख निर्माण झाली आहे. त्यांचं प्रत्येक काम हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असून त्यावर त्यांना शाबासकी देखील मिळत आहे. त्रिपाठी यांचा जन्म 5 सप्टेंबर 1975ला बिहारच्या गोपालगंज येथे झाला होता. एका शेतकरी कुटुंबातून ते आले आहेत. त्यामुळे त्यांना बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली होती.

त्रिपाठी यांनी आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर केल्यानंतर त्यांना अनेक ऑफर्स मिळू लागल्या आहेत. तर त्यासाठी त्यांना मोठी रक्कम देखील मिळते. कॉमेडी, विलन, सकारात्मक सगळ्या प्रकारची पात्र त्यांनी साकारली आहेत. तर प्रत्येक वेळी त्यांच्या अभिनयाची छबी दिसून आली आहे. चित्रपटांव्यतिरिक्त वेबसीरिजमुळे त्यांना मोठी ओळख मिळाली.

2019 मध्ये पंकज त्रिपाठींनी मुंबईतील महागड्या मड आयलंड या ठिकाणी घर खरेदी केलं होतं. अलिशान घराचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. दरम्यान एक असाही काळ होता, जेव्हा त्रिपाठी यांना मुंबईत एका खोलीत राहावं लागलं होतं. कठीण परिस्थितीत आपली पत्नी आपल्यासोबत होती असंही त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. एका खोलीत राहणारे पंकज आज काही बॉलिवूड स्टार्सचे शेजारी आहेत. ज्यात जॅकी श्रॉफ, गोविंदा तसेच आमिर खानचाही समावेश आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या