मुंबई, 12 मार्च- बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री यामी गौतमचा पती आणि ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ (Uri: The Surgical Strike) चा दिग्दर्शक (Director) आदित्य धर (Aditya Dhar) आज आपला 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. आदित्य धर आणि यामी गौतमने गुपचूप लग्न करत सर्वांनाच सुखद धक्का दिला होता. इतक्या अचानक झालं की अनेकांना अजूनही माहिती नाही की त्यांची लव्हस्टोरी नेमकी सुरु कशी झाली होती. आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत. आदित्य आणि यामीने 4 जून 2021 मध्ये लग्न केलं होतं. लग्नानंतर त्यांनी सोशल मीडियावर फोटो सर्वांना माहिती दिली होती. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर येताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. फक्त चाहतेच नव्हे मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारसुद्धा थक्क झाले होते. कारण यामी आणि आदित्यने कधीही आपल्या नात्याची कोणालाही भनकदेखील लागू दिली नव्हती. त्यांच्या नात्याबद्दल कधीच कोणती माहिती समोर आलेली नव्हती. त्यामुळेच अचानक लग्नाचे फोटो पाहून सर्वच थक्क झाले होते. आदित्य धरचा जन्म 12 मार्च 1983 मध्ये दिल्ली येथे झाला आहे. ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाने आदित्य धरला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. परंतु या चित्रपटापूर्वी त्याने काबुल एक्सप्रेस, तेज, आक्रोश, हाल-ए-दिल यांसारख्या चित्रपटांमध्ये संवाद, पटकथा आणि गीतलेखक म्हणून काम केले आहे. मात्र, 2019 मध्ये आलेल्या विकी कौशल-यामी गौतमच्या उरी या चित्रपटातून त्याला खरी ओळख मिळाली होती. आदित्यचा हा पहिला चित्रपट होता आणि यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासोबत अनेक फिल्मफेअर आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. (हे वाचा:
पुष्पा’ नंतर समंथाचा भाव वाढला, आगामी चित्रपटासाठी घेतले तब्बल इतके कोटी
) यामी गौतमसोबत अशी जमली जोडी- अभिनेत्री यामी गौतमसोबत आदित्य धरची लव्हस्टोरी ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली होती. या चित्रपटाच्या सेटवर यामी गौतम आणि आदित्य धर पहिल्यांदाच भेटले होते. एकदा एका मुलाखतीदरम्यान यामीने आदित्यसोबतच्या तिच्या लव्हस्टोरीबद्दल खुलासा करत सांगितले होते की, उरी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आमच्यात बोलणे सुरू झाले आणि नंतर चांगली मैत्री झाली.यामीने सांगितले होते की, पहिल्याच भेटीत ते एकेमकांच्या प्रेमात पडले नव्हते. सुरुवातीला आम्ही चांगले मित्र होतो आणि नंतर हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि नंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला.