JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Alia Bhatt Birthday: लंडनमध्ये आलिशान बंगला, महागड्या कार-हॅन्डबॅग, 29 वर्षांची आलिया आहे इतक्या कोटींची मालकीण

Alia Bhatt Birthday: लंडनमध्ये आलिशान बंगला, महागड्या कार-हॅन्डबॅग, 29 वर्षांची आलिया आहे इतक्या कोटींची मालकीण

Alia Bhatt Birthday: अभिनेत्री आज आपला 29 वा वाढदिवस साजरा करत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 मार्च-   बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt)  आज सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळत आहे. अभिनेत्रीने फारच कमी वयात मोठं यश मिळवलं आहे. एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारत आलियाने आपलं कौशल्य सिद्ध केलं आहे. सध्या आलिया भट्टचा ‘गंगुबाई काठियावाडी’  (Gangubai Kathiawadi)  बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. सोबतच चित्रपटातील आलियाच्या अभिनयाचं विशेष कौतुक केलं जात आहे.  अभिनेत्री आज आपला 29 वा वाढदिवस साजरा  (Alia’s 29 th Birthday Today)  करत आहे. या निमित्ताने अभिनेत्रीच्या नेटवर्थवर एक नजर टाकूया. आलिया भट्ट एक उत्तम अभिनेत्री आहे, सर्वांनाच माहिती आहे. परंतु फारच कमी लोकांना माहिती आहे की, आलिया एक निर्मातीसुद्धा बनली आहे. आलियाने अभिनेता शाहरुख खानसोबत निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. आलिया आता केवळ 29 वर्षांची आहे. मात्र तिच्या संपत्तीचा आकडा वाचून थक्क व्हाल. या वयात आलिया भट्टचा नेटवर्थ 165 कोटी इतका आहे. आलिया भट्टला गुंतवणूक करण्याची आवड आहे. ती सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करत असते. सध्या ती बांद्रा याठिकाणी आलिशान बंगल्यात राहात आहे. या बंगल्याची किंमत 32 कोटी रुपये आहे. आलिया भट्टनेही काही दिवसांपूर्वी जुहूमध्ये एक आलिशान घर घेतले आहे. याशिवाय लंडनमध्येसुद्धा एका प्रतिष्ठीत ठिकाणी आलिया भट्टचं सुंदर घर आहे. आलिया भट्टकडे स्वतःची व्हॅनिटी व्हॅनदेखील आहे ज्याची किंमत करोडोंमध्ये आहे. आलिया भट्टने याशिवाय प्रॉपर्टीमध्येही गुंतवणूक केली आहे. एवढेच नाही तर आलिया भट्टने रणबीर कपूरच्या बिल्डिंगमध्ये घरही घेतले आहे. आलिया भट्टला किंग साइज लाइफ आवडते आणि ती तिच्या मोकळ्या वेळेत घरी राहणे पसंत करते. कार आणि हॅन्डबॅग कलेक्शन- आलिया भट्टला कारची खूप आवड आहे. तिच्याकडे Audi Q7, Audi 6, BMW 7 Series, Land Rover Range Rover सारख्या महागड्या कारचं कलेक्शन आहे. रेंज रोव्हरची किंमत 1.88 कोटी रुपये आहे. तर BMW ची किंमत 1.37 कोटी रुपये आहे.शिवाय आलियाला महागड्या हॅन्डबॅगचीसुद्धा आवड आहे. तिच्याकडे लुई व्हिटॉन, गुच्ची आणि पराडा यांसारख्या महागड्या बॅगचं कलेक्शन आहे. एयरपोर्टवरही आलिया भट्ट अनेकदा या बॅगसोबत दिसली आहे. आलिया भट्टच्या प्रत्येक बॅगची किंमत लाखोंमध्ये आहे. (हे वाचा: प्रभासच्या ‘राधेश्याम’चा विक्रम; अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’लाही टाकलं मागे ) आलिया भट्ट फक्त चित्रपटांमधूनच नव्हे तर ब्रँड एंडोर्समेंट आणि इव्हेंटमधूनदेखील अफाट कमाई करते. आलिया प्रत्येक चित्रपटासाठी 10 कोटी रुपये मानधन घेते. त्याचबरोबर ब्रँड एंडोर्समेंटसाठी आलिया एक ते दीड कोटी रुपये घेते. शिवाय, कार्यक्रमांसाठी ती 30 ते 50 लाखांपर्यंत मानधन घेते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या