मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /प्रभासच्या ‘राधेश्याम’चा विक्रम; अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’लाही टाकलं मागे

प्रभासच्या ‘राधेश्याम’चा विक्रम; अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’लाही टाकलं मागे

allu arjun pushpa

allu arjun pushpa

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार्सच्या सुपरहिट चित्रपटांबद्दल आपण नेहमीच ऐकतो. सध्या गाजत असलेल्या ‘पुष्पा- द राईज’(Pushpa: The Rise) चित्रपटाच्या यशाबद्दल तर सगळीकडेच चर्चा सुरु आहे. अल्लू अर्जुनचे तर जगभरात फॅन्स आहेत. पण या फॅन्ससाठी एक निराशाजनक बातमी आहे. पण ही बातमी प्रभासच्या फॅन्ससाठी मात्र आनंदाची गोष्ट आहे.

पुढे वाचा ...

    नवी दिल्ली, 14 मार्च:  साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार्सच्या सुपरहिट चित्रपटांबद्दल आपण नेहमीच ऐकतो. सध्या गाजत असलेल्या ‘पुष्पा- द राईज’(Pushpa: The Rise) चित्रपटाच्या यशाबद्दल तर सगळीकडेच चर्चा सुरु आहे. अल्लू अर्जुनचे तर जगभरात फॅन्स आहेत. पण या फॅन्ससाठी एक निराशाजनक बातमी आहे. पण ही बातमी प्रभासच्या फॅन्ससाठी मात्र आनंदाची गोष्ट आहे. कारण त्याच्या ‘राधेश्याम’ चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बंपर ओपनिंग केलं आहे. बॉलीवूडलाईफ डॉट कॉमनं याबद्दलचंच वृत्त दिलं आहे.

    प्रभासच्या ‘राधेश्याम’नं बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी मोठी कमाई केली आहे. इतकंच नाही तर टॉप 10 ऑल इंडिया ओपनर्स ऑफ ऑल टाइम फिल्म्समध्ये (Top 10 All India Openers Of All Time) या चित्रपटाचा समावेश झाला आहे. विशेष म्हणजे या सुपर चित्रपटांच्या लिस्टमधला प्रभासचा हा चौथा चित्रपट आहे. त्याचबरोबर प्रभासनं अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’लाही मागे टाकलं आहे. एकदा नजर टाकूया या सगळ्या लिस्टवर.

    बाहुबली 2 (Baahubali 2: The Conclusion)

    टॉप 10 इंडियन हायेस्ट ग्रोसर फिल्म्सच्या यादीत सुपरस्टार प्रभासचा बाहुबली 2 अजूनही पहिल्याच क्रमांकावर आहे. अजूनही या चित्रपटाला कोणीही मागे टाकू शकलं नाही. या चित्रपटानं देशभरात पहिल्याच दिवशी 121 कोटी रुपयांची कमाई केली होती.

    साहो (Saaho)

    या चित्रपटांच्या लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावरही प्रभासचाच (Prabhas) चित्रपट आहे. फिल्म ‘साहो’ दुसऱ्या क्रमांकावर आहे. या चित्रपटानं पहिल्या दिवशी संपूर्ण देशभरात 88 कोटी रुपयांची कमाई केली होती.

    2.0

    बॉलीवूड सुपरस्टार अक्षयकुमार (Akshay KUmar) आणि तमीळ सुपरस्टार रजनीकांतचा (Rajanikant) 2.0 हा चित्रपट तिसऱ्या क्रमांकावर आहे. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी 63 कोटी रुपयांची कमाई केली होती.

    वॉर (War)

    हृतिक रोशन (Hritik Roshan) आणि टायगर श्रॉफच्या ( Tiger Shroff) या ॲक्शन ड्रामानं पहिल्याच दिवशी 53.35 कोटी रुपयांची कमाई केली होती. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदचा हा चित्रपट तरुण आणि लहान मुलांना विशेष आवडला होता.

    सई रा नरसिम्हा रेड्डी (Sye Raa Narasimha Reddy)

    दक्षिणेतला आणखी एक सुपरस्टार चिरंजीवीचा (Chiranjeevi) हा पीरियड ड्रामा या लिस्टमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चनचीही भूमिका होती. या चित्रपटानं देशभरात बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी 52.50 कोटींची कमाई केली होती.

    ठग्ज ऑफ हिंदुस्थान (Thugs If Hindustan)

    आमीर खान-अमिताभ बच्चन (Aamir Khan- Amitabh Bachchan) आणि कतरिना कैफ (Katerina Kaif) अशी बडी स्टारकास्ट असलेला हा हिंदी चित्रपट सपशेल आपटला होता असं मानलं जातं तरीही त्यानं पहिल्याच दिवशी रग्गड कमाई केली होती. पहिल्याच दिवशी या चित्रपटानं 52.25 कोटी रुपयांची कमाई केली होती.

    राधेश्याम (Radhe Shyam)

    सुपरस्टार प्रभासच्या राधे श्याम या चित्रपटानं या लिस्टमध्ये सॉलिड एंट्री केली आहे. हा चित्रपट सातव्या स्थानावर आहे. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी देशभरात बॉक्स ऑफिसवर 46.48 कोटी रुपयांची कमाई केली.

    पुष्पा- द राईज (Pushpa- The rise)

    अल्लू अर्जुन स्टारर ब्लॉकबस्टर फिल्म पुष्पा- द राईज देशभरात हिट ठरला होता. पण त्याची कमाई पहिल्या दिवशी इतकी खास झाली नव्हती. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी 45.45 कोटी रुपयांची कमाई केली होती.

    हॅपी न्यू इयर (Happy New Year)

    2014 साली आलेल्या या चित्रपटात शाहरुख खान, अभिषेक बच्चन, दीपिका पदुकोण, बोमन इराणी, सोनू सूद अशी तगडी स्टारकास्ट होती. बॉलीवूडच्या या चित्रपटानं पहिल्याच दिवशी 44.97 कोटींची कमाई केली होती.

    बाहुबली (Bahubali- The Beginning)

    बाहुबली- द बिगिनिंग या चित्रपटानं अक्षरश: धुमाकूळ घातला होता. दिग्दर्शक राजामौलींच्या या चित्रपटात प्रभासबरोबरच अनुष्का शेट्टी आणि राणा दग्गुबत्ती यांच्या प्रमुख भूमिका होत्या. प्रचंड हिट ठरलेल्या या चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 42 कोटींची कमाई केली होती.

    एकूणच या ऑल टाइम हिट आणि बंपर कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये प्रभासच्या चित्रपटांचंच वर्चस्व दिसतंय.

    First published:
    top videos

      Tags: Allu arjun, Entertainment, Prabhas, South indian actor