JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / HBD: हंसिका न्यूड व्हिडीओमुळे आली चर्चेत; आज आहे लोकप्रिय अभिनेत्री

HBD: हंसिका न्यूड व्हिडीओमुळे आली चर्चेत; आज आहे लोकप्रिय अभिनेत्री

फिल्मी करिअरच्या सुरुवातीस ती एका न्यूड व्हिडीओमुळे चर्चेत होती. (Hansika Motwani viral video) किंबहूना याच वादग्रस्त व्हिडीओमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली असं म्हटलं जातं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 9 ऑगस्ट**:** शाका लाका बुम बुम या मालिकेतून घराघरात पोहोचलेली हंसिका मोटवानी (Hansika Motwani) ही आज दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (hansika motwani movies) विविध चित्रपटांच्या माध्यमातून जवळपास गेली दोन दशकं ती सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. आज हंसिकाचा वाढदिवस आहे. (hansika motwani birthday) 30 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण आपल्या फिल्मी करिअरच्या सुरुवातीस ती एका न्यूड व्हिडीओमुळे चर्चेत होती. (Hansika Motwani viral video) किंबहूना याच वादग्रस्त व्हिडीओमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली असं म्हटलं जातं. ‘अशी नशीबानं थट्टा आज मांडली’; ललित प्रभाकरचा Video पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क देस में निकला होगा चांद या मालिकेतून हंसिकाने आपल्या करिअरची सुरूवात केली होती. त्यानंतर तिने सोन परी, करिश्मा का करिश्मा, क्योकी सास भी कभी बहु थी, यांसारख्या काही मालिकांमध्ये बालकलाकाराची भूमिका साकारली. शाका लाका बुम बुम या मालिकेमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली होती. यामुळेच तिला कोई मिल गया या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. परंतु त्यानंतर हंसिका काही वर्षांसाठी मनोरंजनसृष्टीतून एकाएकी गायब झाली. ‘बेड आणि बाथरूम शेअर करणार नाही’; बिग बॉस स्पर्धकांना नेहाचा इशारा पुढे हंसिकाने आपलं लक्ष दाक्षिणात्य चित्रपटांच्या दिशेने वळवलं. मस्का, पावर, मेघम्मा, वालू यांसारखे काही चित्रपट तिने केले. परंतु यांना म्हणावं तस यश मिळालं नाही. याच दरम्यान एक न्यूड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमधील तरूणीचा चेहरा हंसिकाशी मिळताजुळता होता. त्यामुळे हा व्हिडीओ हंसिकाचाच आहे असं म्हटलं जात होतं. परंतु या व्हिडीओविरोधात तिने सायबर पोलिसांकडे तक्रार केली. मात्र या वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणानंतर ती पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली. वृत्तमाध्यमांमध्ये देखील तिचीच चर्चा होऊ लागली. या पार्श्वभूमीवर तिने प्रसिद्धीसाठीच हा व्हिडीओ व्हायरल केला अशी देखील टीका काही नेटकऱ्यांनी केली होती. परंतु त्यामागचं खरं कारण काहीही असलं तरी यानंतर ती चर्चेत आली अन् तिला अनेक मोठ्या प्रोजेक्टच्या ऑफर्स मिळू लागल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या