Home /News /entertainment /

‘अशी नशीबानं थट्टा आज मांडली’; ललित प्रभाकरचा Video पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क

‘अशी नशीबानं थट्टा आज मांडली’; ललित प्रभाकरचा Video पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क

हाथ धुवायला गेला असता बाथरूममध्ये त्याच्यासोबत अशी एक घटना घडली की जे पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही.

  मुंबई 8 ऑगस्ट: ‘जुळून येती रेशिम गाठी’ (Julun Yeti Reshimgathi) या मालिकेतून घराघरात पोहोचलेला ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) हा मराठी मनोरंजनसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जातो. चित्रपट आणि मालिकांसोबतच तो सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतो. विविध प्रकारचे व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यमातून कायम चर्चेत असतो. (Lalit Prabhakar funny video) यावेळी देखील तो अशाच एका गंमतीशीर व्हिडीओमुळे चर्चेत आहे. हाथ धुवायला गेला असता बाथरूममध्ये त्याच्यासोबत अशी एक घटना घडली की जे पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही. ललितने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो वॉशबेसिन समोर उभा आहे. त्याला कळत नाही आहे की नळ कसा सुरू करावा. तसंच जर त्याने एका नळा खाली हात धरला असेल तर पलीकडच्या नळातून पाणी यायला सुरुवात होते. या प्रकरामुळे तो अक्षरश: वैतागला आहे. “हाथ भी नही आया और मूह भी नही लगा” असं कॅप्शन त्याने या व्हिडीओवर दिलं आहे. सोबतच या परिस्थितीला साजेल असं गाणं देखील या व्हिडीओमध्ये ऐकायला येत आहे. फक्त साडी नेसून केलं फोटोशूट; मौनी रॉयचा हॉट अंदाज पाहून चाहते झाले 'पाणी पाणी'
  ‘अशा मुलांना 15 मार्क अधिक द्या’; प्रशांत दामले यांची महाराष्ट्र सरकारला विनंती ललितच्या या पोस्टवर अभिनेत्री स्पृहा जोशी, मृण्मयी गोडबोले, अमृता खानविलकर आणि हेमंत ढोमे याने देखील कमेंट केल्याचे दिसून आले. तसच फॅन्सना पण त्याची ही पोस्ट प्रचंड विनोदी वाटली आहे. त्यांनी त्या पोस्टवर लाईक्सचा आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
  Published by:Mandar Gurav
  First published:

  Tags: Tv actors, Video viral

  पुढील बातम्या