JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / अमिताभ बच्चन यांचे सहकलाकर हरीश मॅगन यांचं निधन; 'या' प्रसिद्ध सिनेमांत केलंय काम

अमिताभ बच्चन यांचे सहकलाकर हरीश मॅगन यांचं निधन; 'या' प्रसिद्ध सिनेमांत केलंय काम

अभिनेत्याच्या निधनाची माहिती एका दिवसानंतर समोर आली. अमिताभ बच्चन यांच्याबरोबर अनेक सिनेमात त्यांनी काम केलं आहे.

जाहिरात

अभिनेते हरीश मॅगन यांचं निधन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 03 जुलै : बॉलिवूडमधून एक दु:ख बातमी समोर आली आहे. 70-80च्या दशकात आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडणारे अभिनेते हरीश  मॅगन यांचं निधन झालं. 1 जुलै रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 76 वर्षांचे होते. अमिताभ बच्चन यांच्याबरोबर हरीश मॅगन यांनी ‘नमक हलाल’ या सिनेमात काम केलं होतं. सिनेमातील त्यांची भुमिका चांगलीच फेमस झाली होती. त्यांच्या निधनानं बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. हरीश यांनी ‘गोलमाल’ आणि ‘शहंशाह’ सारख्या प्रसिद्ध सिनेमातही काम केलं आहे. हरीश यांच्या मृत्यूपश्चात त्यांची पत्नी, मुलगा सिद्धार्थ आणि मुलगी आरूषी असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. 1 जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला पण दोन दिवसांनी त्यांच्या मृत्यूची माहिती समोर आली. हरीश हे अनेक काळापासून सिनेसृष्टीपासून दूर होते. असं असलं तरी ते मुंबईत स्वत:ची अभिनय कार्यशाळा चालवत होते. हेही वाचा - ‘रिमझिम गिरे सावन’चं रिक्रिएशन; मुंबईतील लोकेशन्स आणि आयफोनची कमाल, आनंद महिद्राही झाले फिदा सिने टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनच्या ट्विटर हँडलवरून अभिनेते हरीश मॅगन यांच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे. हरीश मॅगन हे 1988पासून असोसिएशनचे सदस्य होते. हरीश यांचा जन्म 6 डिसेंबक 1946साली झाला. त्यांनी FTII मधून अभिनयाचं शिक्षण घेतलं होतं. 1974च्या बॅचचे ते विद्यार्थी होते. ‘चुपके चुपके’, ‘मुक्कदर का सिंकदर’ 1997मध्ये आलेल्या ‘उफ्फ ये मोहब्बत’ सारख्या सिनेमाता त्यांनी काम केलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या