मुंबई 15 जून: बॉलिवूडची गोड अभिनेत्री जेनेलिया डिसुझा-देशमुख (Genelia D’souza-Deshmukh) ही फक्त एक अभिनेत्री नाहीये तर ती महाराष्ट्राची सून सुद्धा आहे. जेनेलिया ही एक गुणी आणि कुशल अभिनेत्री आहे. जेनेलिया आणि रितेश यांचे प्रेम संबंध सगळ्यांनाच चांगले माहित आहेत. जेनेलिया ही रितेश देशमुखची पत्नी र मा. विलासराव देशमुख यांची सून आहे. जेनेलियाने तिच्या सासऱ्यांशी असलेलं नातं सांगणारा एक खास फोटो शेअर केलं आहे ज्याची बरीच चर्चा होताना दिसत आहे. जेनेलिया (Genelia Deshmukh Instagram) सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असते. तिचे धमाल रील्स तर प्रचंड पसंत केले जातात. नवरा रितेशसोबत ती अनेक भन्नाट विडिओ सुद्धा पोस्ट करत असते. तिने आज खास सोशल मीडियावर Ask Me Anything ची स्टोरी पोस्ट केली होती. ज्यात ती फॅन्सच्या काही निवडक प्रश्नांना उत्तरं देत होती. तिला एका चाहत्याने ‘विलासराव देशमुखांसोबतची खास आठवण शेअर करायची विनंती केली होती. तेव्हा तिने त्यांच्यासोबतच खास आणि गोड फोटो शेअर करत त्याखाली ‘पप्पा’ अशी कॅप्शन दिली होती. जेनेलियाने तिच्या लग्नतला गळाभेट घेतानाचा फोटो शेअर करत त्यांची आठवण ताजी केली आहे.
जेनेलिया ज्या घरात लग्न करून आली ते घर काही साधंसुधं घर नाहीये. की मोठा राजकीय इतिहास असलेलं हे घर आहे. जेनेलियाने सासरे (Genelia Deshmukh father in law) अर्थात कै.मा. विलासराव देशमुख आहेत. रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) हा मराठी आणि बॉलिवूडमधील एक सफल अभिनेता आहे. जेनेलिया आणि रितेश यांच्या लग्नाच्या वेळी काढलेला मेमरेबल फोटो तिने शेअर केल्याने चाहत्यांना बराच आनंद झाला आहे. जेनेलियाचे विलासराव यांच्याशी कायमच चांगले संबंध राहिले आहेत. तिच्या वडिलांसारखंच ती त्यांना मानते हे या कॅप्शनवरून समजतं.
जेनेलियाने याआधी सुद्धा विलासरावांच्या वाढदिवशी एक खास पोस्ट शेअर केली होती. ज्यात तिने त्यांची बरीच आठवण येते असं म्हटलं आहे. हे ही वाचा- Karan Johar News: ‘माझ्या आयुष्यात एक लाईफ पार्टनर नाही…’ करण जोहरने व्यक्त केली मोठी खंत! तिच्या वर्क फ्रंटवर सांगायचं झालं तर ‘वेड’ या सिनेमातून ती तब्ब्ल दहा वर्षांनी कमबॅक करत आहे. याच दिग्दर्शन रितेश देशमुख स्वतः करत आहे. मिस्टर मम्मी, ट्रायल पिरियड असे काही सिनेमे तिचे पाईपलाईनमध्ये आहेत.