JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘ताई तू मुंबई पोलिसांचा विचार कर’; राज कुंद्राला पाठिंबा देणारी गहना पुन्हा ट्रोल

‘ताई तू मुंबई पोलिसांचा विचार कर’; राज कुंद्राला पाठिंबा देणारी गहना पुन्हा ट्रोल

गंदी बात फेम अभिनेत्री गहना वशिष्ट (Gehana Vasisth) सध्या प्रचंड चर्चेत आहे. महिन्याभरापूर्वीच ती तुरूंगातून बाहेर आली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 26 जुलै**:** गंदी बात फेम अभिनेत्री गहना वशिष्ट (Gehana Vasisth) सध्या प्रचंड चर्चेत आहे. महिन्याभरापूर्वीच ती तुरूंगातून बाहेर आली. राज कुंद्रासोबतच तिच्यावर देखील पॉर्नोग्राफी प्रकरणी खटला सुरु आहे. त्यामुळे गहनावर सध्या जोरदार टीका केली जात आहे. (Raj Kundra Pornography case) दरम्यान या टीकाकारांना प्रत्युत्तर देण्यासाठी तिने एक लांबलचक पोस्ट लिहिली. “देव कोणालाही सोडत नाही. वाईट कृत्याची शिक्षा मिळतेच” असं ती या पोस्टमध्ये म्हणाली. (Gehana Vasisth troll) मात्र यामुळे आता तिच्याविरोधात आणखीच ट्रोलिंग वाढलं आहे. “आमचं सोड पोलिसांना काय उत्तरं द्यायची त्याचा विचार कर” असं म्हणत तिची आणखी खिल्ली उडवली जात आहे.

गहनाच्या आरोपांवर सई ताम्हणकरनं दिली प्रतिक्रिया; म्हणाली, ‘मला राजने…’ नेमकं काय म्हणाली गहना**?** “देव कोणालाही सोडत नाही. प्रत्येकाला त्याच्या कर्माची फळं मिळतातच. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे देवाच्या काठीत आवाज नसतो परंतु जेव्हा ती लागते तेव्हाच कळतं. मी कधीची चुकीची नव्हते. मी काहीही चुकिच कृत्य केलेलं नाही. त्यामुळे जे करायचं आहे ते करा. मोठं होण्यासाठी जर तुम्ही कोणाच्या आयुष्याची वाट लावत असाल तर विसरू नका उद्या दुसरा कोणीतरी येईल आणि तुमच्या कुटुंबाची वाट लावेल.” अशा आशयाची पोस्ट गहनानं केली होती. या पोस्टद्वारे तिने ट्रोलर्सला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. ‘मला पॉर्नोग्राफी प्रकरणात खेचू नका’; गंदी बात फेम अभिनेत्रीची ट्रोलर्सला विनंती

मात्र ट्रोलर्सने देखील माघार घेतली नाही. तिच्या या पोस्ट देखील काही नेटकरी तुटून पडले. तुझ्या सारखे व्यवसाय आम्ही करत नाही त्यामुळे तू आमची काळजी करू नकोस. मेहनत करून पैसे कमावणाऱ्याना देव कधीही त्रास देत नाही, मुंबई पोलीस आता तुला तुझ्या कृत्याची शिक्षा देतील. ताई तू आमची काळजी करू नकोस पोलिसांना चौकशीत काय उत्तरं द्यायची याचा विचार कर अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या