JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / शेवटी बापचं काळीज ओ! लहानपणी गौतमीला दूर केलं, 20 वर्षांनी पोरीवर टिका होताच बापाला फुटला मायेचा पाझर

शेवटी बापचं काळीज ओ! लहानपणी गौतमीला दूर केलं, 20 वर्षांनी पोरीवर टिका होताच बापाला फुटला मायेचा पाझर

सततच्या मारहाणीला कंटाळून गौतमीच्या आजोबांनी तिच्या आईला माहेरी परत घेऊन आले होते. त्यामुळे मागील 20 वर्षांपासून गौतमी तिच्या वडिलांपासून दूर आहे. लेकीवर टीका होत असताना गौतमीचे वडील भावूक झाले असून लेकीच्या पाठिशी खंबीर उभे आहेत. त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

जाहिरात

गौतमी पाटीलचे वडील आले समोर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 01 जून : डान्सर गौतमी पाटीलची सध्या सर्वत्र चर्चा आहे. गौतमीची वाढती प्रसिद्ध पाहता तिच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तिच्या प्रसिद्धीत वाढ होत असताना तिच्यावर टीक करणाऱ्यांची संख्या देखील तितकीच आहे. गौतमीचं आडनाव पाटील नसल्याचा दावा करत मराठी संघटनांनी विरोध केला.  गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करते आहे. असा आरोप तिच्यावर करण्यात आला. या प्रकरणानंतर गौतमी पाटीलचं घराणं कोणतं? तिचे आई-वडील कोण? या सगळ्याचा शोध सुरू झाला. अशातच गौतमी वडील समोर आले असून त्यांनी लेकीवर होत असलेल्या टीकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. गौतमीनं एका मुलाखतीत वडिलांनी तिला आणि तिच्या आईला 20 वर्षांपूर्वी दूर केल्याचा खुलासा केला होता. गौतमीच्या वडिलांचं नाव  रविंद्र बापू नेरपगारे पाटील असं आहे. त्यांचं वय 65 वर्ष आहे.   ते जळगाव जिल्ह्यातील चोपळा तालुक्यातील वेळोदे गावात राहतात. गौतमी चौथीपर्यंत इथे मोठी झाली. त्यानंतर ती पुण्यात शिफ्ट झाली. मटाशी बोलताना गौतमीचे वडील म्हणाले,  “18-20 वर्षांपूर्वी मी पुण्यात नोकरीला होते. वय झाल्याने मला नोकरीला कोणी ठेवतं नव्हतं. मी बायकोला सांगून पुन्हा गावाला येऊया असं सांगितलं पण तिने मुलीला घेऊन गावी येणार नाही असं सांगितलं.  तेव्हापासून मी बायको आणि मुलीपासून दूर आहे”. हेही वाचा -  Gautami Patil : आडनावावरून उठलेल्या वादावर गौतमीने सोडलं मौन; म्हणाली ‘माझं नाव पाटील आणि मी…’ ते पुढे म्हणाले, “गौतमी मला लहान असताना पप्पा म्हणायची. मी गौतमीला गौतमी बेटा अशी हाक मारायचो. तिचं खरं नाव गौतमीच आहे. तिची आजी तिला वैष्णवी नावाने हाक मारायची. आज ती चांगला डान्स करते याचा आनंदही होतो आणि थोड वाईटही वाटतं. लोक तिच्यावर टीका करतात याचं वाईट वाटतं. माझ्या मुलीनं पाटील हे आडनाव का लावू नये? तिचं आडनाव पाटील आहे ते आडनाव ती लावणार. मी बाप म्हणून तिच्या पाठिशी आहे. ती एक कलाकार आहे.  इतर कलाकारांप्रमाणे ती तिची कला सादर करते”, असं म्हणत गौतमीच्या वडिलांनी लेकीला पाठिंबा दिला आहे.

“गौतमी आणि माझी बायको माझ्याबरोबर असल्याचं मला दु:ख वाटतं. गौतमी पुन्हा माझ्याबरोबर राहावी. तिने मला पप्पा म्हणून हाक मारावी”, असं मला वाटतं असंही ते म्हणाले. मी तिला भेटून तू माझी मुलगी आहे हे मी सांगेन, अशा भावनाही गौतमीच्या वडिलांनी व्यक्त केल्या.  हे सांगताना गौतमीच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते ढसाढसा रडू लागले. गौतमीच्या वडिलांनी आपल्याला चांगली नोकरी, घर असल्याचं सांगून तिच्या आईसोबत लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या पहिल्याच दिवशी ते घरी दारु पिऊन आले होते. त्यांनंतर सतत त्यांचं दारु पिऊन येणं, मारहाण करणं सुरु झालं होतं. अशातच गौतमीची आई गरोदर होती. तरीही तिचे वडील आईची काळजी घेणं दूरच साधी विचारपूसदेखील करत नव्हते. सततच्या मारहाणीला कंटाळून गौतमीच्या आजोबांनी तिच्या आईला माहेरी परत घेऊन आले होते, असं गौतमीनं नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या