JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / डॉक्टरांना चोर म्हणणं सुनील पालला पडलं भारी; अभिनेत्याविरोधात पोलीस तक्रार दाखल

डॉक्टरांना चोर म्हणणं सुनील पालला पडलं भारी; अभिनेत्याविरोधात पोलीस तक्रार दाखल

हे डॉक्टर्स देवदूत नाहीत राक्षस आहेत असं तो म्हणाला होता. या वादग्रस्त विधानामुळं आता त्याच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 6 मे**:** कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. (coronavirus) रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळं आरोग्य व्यवस्थेवरील ताणही वाढत चालला आहे. परिणामी रुग्णालयात बेड, ऑक्सिजन, औषध, लसी यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. परंतु या प्रतिकूल परिस्थितीचा देशातील 90 टक्के डॉक्टर्स गैरफायदा घेत आहेत असा आरोप प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन आणि अभिनेता सुनील पाल (Sunil Pal) यानं केला होता. हे डॉक्टर्स देवदूत नाहीत राक्षस आहेत असं तो म्हणाला होता. (Sunil Pal for Defaming Doctors) या वादग्रस्त विधानामुळं आता त्याच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार असोसिएट ऑफ मेडिकल कंसल्टंटच्या अध्यक्षा सुष्मिता भटनागर यांनी अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल केली आहे. सुनील पाल डॉक्टरांची बदनामी करण्याचा प्रयत्न करतोय असा आरोप त्यांनी केला आहे. सुनीलचा एक व्हिडीओ त्यांनी 4 मे रोजी पाहिला होता. या व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर सुनीलला कठोर शिक्षा करावी अशी विनंती त्यांनी केली आहे. मॅच फिक्सिंगमुळं संपलं विंदु दारा सिंहचं करिअर; सलमानही वाचवू शकला नाही करिअर प्रकरण काय आहे**?** काही दिवसांपूर्वी सुनीलनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओद्वारे त्यानं देशातील सद्य परिस्थितीवर भाष्य केलं होतं. शिवाय डॉक्टरांवर गंभीर आरोप देखील केले होते. तो म्हणाला होता, “देशातील 90 टक्के डॉक्टर्स चोर आहेत. दे कोरोनाग्रस्त परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत. गरीबांनाकडून लाखो रुपये उकळत आहेत. साधं पाच रुपयांचं औषध 100 रुपयांना देखील विकत आहेत.” मात्र त्याच्या या व्हिडीओवर काही नेटकरी संतापले. त्याच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. शिवाय पोलीस तक्रारही करण्यात आली. त्यानंतर त्यानं हा व्हिडीओ डिलिट केला व संतापलेल्या नेटकऱ्यांची माफी मागितली. मात्र आपल्या विचारांवर तो ठाम आहे. तो म्हणाला “देशातील 10 टक्के डॉक्टर्स प्रामाणिकपणे काम करतायेत त्यामुळं देश कोरोना विरोधात लढतोय.” पोलिसांद्वारे या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या