मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

मॅच फिक्सिंगमुळं संपलं विंदु दारा सिंहचं करिअर; सलमानही वाचवू शकला नाही करिअर

मॅच फिक्सिंगमुळं संपलं विंदु दारा सिंहचं करिअर; सलमानही वाचवू शकला नाही करिअर

त्याच्याविरोधात प्रेक्षक इतके संतापले होते की बॉलिवूडचा भाईजान सलमान खानही त्याचं करिअर वाचवू शकला नाही. पाहूया विंदु दारा सिंहचा अर्श ते फर्श असा उलट प्रवास...

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 6 मे: विंदु दारा सिंह (Vindu Dara Singh) का कधीकाळी बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जायचा. खरं त्यानं पंजाबी चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. अन् मग पुढे त्याला बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यानं सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांच्या बिग बजेट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. कधीकाळी तो देखील यशाच्या शिखरावर होता. परंतु IPL मध्ये केलेल्या मॅच फिक्सिंगमुळं त्याचं करिअर एकाएकी संपलं. त्याच्याविरोधात प्रेक्षक इतके संतापले होते की बॉलिवूडचा भाईजान सलमान खानही त्याचं करिअर वाचवू शकला नाही. पाहूया विंदु दारा सिंहचा अर्श ते फर्श असा उलट प्रवास...

विंदु हा लोकप्रिय अभिनेते दारा सिंह यांचा मुलगा आहे. त्याचं करिअर घडवण्यासाठी वडिलांनी प्रचंड प्रयत्न केले होते. 1994 साली त्यांनी एका पंजाबी चित्रपटाची निर्मिती करुन आपल्या मुलाला लॉन्च केलं होतं. पण हा चित्रपट आपटला. त्यानंतर अक्षय कुमारच्या मदतीनं विंदुनं बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली. पुढे सैफ अली खान, अजय देवगण यांच्या चित्रपटात लहानमोठ्या भूमिका साकारुन तो बॉलिवूडमध्ये कार्यरत होता. याच दरम्यान 2013 साली तो IPL मॅच फिक्सिंगमध्ये अडकला.

विंदुनं चैन्नई सुपरकिंग या टीममध्ये पैसे गुंतवले होते. शिवाय तो महेंद्र सिंह धोनीची पत्नी साक्षीचा खास मित्र देखील होता. दरम्यान पोलिसांनी IPL मधील फिक्सिंग प्रकरण शोधून काढलं अन् यात विंदुचं नाव समोर आलं. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटकही केली होती. त्यावेळी धोनीच्या पत्नीचं नावही संशयास्पद पद्धतीनं पुढे आलं होतं. परंतु पुराव्यांअभावी ते दोघंही सुटले. मात्र धोनीच्या चेन्नई सुपरकिंगला दोन वर्षांसाठी IPL मधून सस्पेंड करण्यात आलं. या प्रकरणामुळं विंदुच्या करिअरला उतरती कळा लागली. त्याला चित्रपटांमध्ये काम मिळेनासं झालं. धोनीनं देखील त्याच्यासोबत मैत्री तोडली. दरम्यान सलमान खाननं बिग बॉसद्वारे त्याचं करिअर वाचवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यामध्ये तो अपयशी ठरला. अशा प्रकारे मॅच फिक्सिंगमुळं दारा सिंह यांच्या मुलाचं करिअर संपलं.

First published:

Tags: Career in danger, Cricket, Entertainment, Ipl, Match, Spot fixing