JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO: फातिमा सना शेख सोबतचा आमिर खानचा 'तो' VIDEO पाहून नेटकरी एकच म्हणतायतं, 'आता लग्न कधी...'

VIDEO: फातिमा सना शेख सोबतचा आमिर खानचा 'तो' VIDEO पाहून नेटकरी एकच म्हणतायतं, 'आता लग्न कधी...'

बॉलिवूडची ‘दंगल’ गर्ल फातिमा सना शेख आणि आमिर खान यांच्या जवळीकतेबाबत अनेक अफवा पसरल्या आहेत. आता आमिर खानचा या अभिनेत्रीसोबत एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

जाहिरात

फातिमा सना शेख-आमिर खान

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 मे :  बॉलिवूड अभिनेता आमिर खानने जरी चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला असला तरी तो कायम या ना त्या कारणामुळे चर्चेत असतो. करिअर पेक्षा आमिर खानचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत असतं. आमिरने आतापर्यंत दोनदा संसार थाटला पण दोन्हीही नाती टिकू शकली नाहीत. आमिरने पाहिलं लग्न रीना दत्ता सोबत तर दुसरं लग्न किरण राव सोबत केलं होतं. पण आता दोघींपासुनही तो वेगळा झाला आहे. आमिर खान आणि किरण राव यांनी 2021 मध्ये घटस्फोटाची घोषणा केल्यावर तर चाहत्यांना धक्काच बसला. पण या दोघांच्या नात्यात दुरावा येण्यासाठी एका अभिनेत्रीला कारणीभूत ठरवलं गेलं. या सगळ्या चर्चांनंतर आता आमिर खानचा या अभिनेत्रीसोबत एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बॉलिवूडची ‘दंगल’ गर्ल फातिमा सना शेख आणि आमिर खान यांच्या जवळीकतेबाबत अनेक अफवा पसरल्या आहेत. दरम्यान, आता दोघांचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आला, ज्यावर चाहत्यांनी खूप कमेंट्स केल्या. आमिर खान आणि फातिमा सना शेख यांनी पहिल्यांदा नितीश तिवारीच्या स्पोर्ट्स ड्रामा दंगलमध्ये एकत्र काम केले होते, जिथे दोघांनी वडील-मुलीच्या भूमिका केल्या होत्या. यानंतर दोघांनी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मध्येही काम केले.

आमिर आणि फातिमाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये दोघेही एकत्र पिकलबॉल खेळताना दिसत आहेत. पापाराजींनी आमिर आणि फातिमा सना शेख यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. जिथे दोघे पिकलबॉल खेळताना दिसत आहेत. आमिरने काळी ट्रॅक पँट आणि लाल टी-शर्ट घातला होता, तर फातिमाने कॅज्युअल ग्रे शर्ट आणि ब्लॅक शॉर्ट्स परिधान केले होते. हा व्हिडीओ पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओवर एकाने कमेंट करत लिहिलं की, “ही तर तिसऱ्या मम्मीची तयारी’ तर दुसऱ्या युजरने ‘आमिर आता तिसरी बायको आणणार’, अशी कमेंट केली आहे. दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. Nitesh Pandey Wife: नितेश पांडेंनी दोनदा बांधलेली लग्नगाठ; पहिली पत्नी होती प्रसिद्ध मराठी अभिनेत्री फातिमा आमिर खानच्या कुटुंबाच्या खूप जवळ असल्याचंही म्हटलं जातं. एका मुलाखतीत जेव्हा फातिमाला आमिर खानसोबतच्या अफेअरच्या अफवांबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने उत्तर दिलं होतं की, लोकांना उत्तर देणे मला अजिबात आवश्यक वाटत नाही. हा त्यांचा मुद्दा अजिबात नाही. लोक अनेकदा तुमच्याबद्दल काहीतरी आरोप करतात. यावर मला काही बोलायचं नाही.’

संबंधित बातम्या

फातिमा सना शेखही आमिर खानची मुलगी आयरा खानच्या एंगेजमेंटमध्ये दिसली होती. त्यादरम्यान अभिनेत्याचे संपूर्ण कुटुंब दिसले. आयरा खानने गेल्या वर्षी बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत एंगेजमेंट केली होती. जिथे दोघांचे कुटुंबीय उपस्थित होते. यात फातिमाच्या हजेरीनं सगळ्यांचंच लक्ष वेधलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या