JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / स्वतःच्याच संगीत फंक्शनमध्ये नशेत होती 'ही' सेलेब्रिटी गर्ल; ओळखलं का थ्रोबॅक फोटोमध्ये असणाऱ्या अभिनेत्रींना?

स्वतःच्याच संगीत फंक्शनमध्ये नशेत होती 'ही' सेलेब्रिटी गर्ल; ओळखलं का थ्रोबॅक फोटोमध्ये असणाऱ्या अभिनेत्रींना?

सध्या सोशल मीडियावर एक थ्रोबॅक फोटो व्हायरल होतो आहे. यामध्ये एक-दोन नव्हे तब्बल 3 सेलिब्रेटी दिसून येत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 जुलै-   सोशल मीडियावर नेहमीच सिनेसृष्टीतील कलाकारांचे थ्रोबॅक फोटो व्हायरल होत असतात. चाहत्यांनासुद्धा आपल्या आवडत्या कलाकारांचे जुने फोटो पाहायला प्रचंड आवडतं. हे कलाकार इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी किंवा आपल्या करिअरच्या सुरुवातीला कसे दिसायचे हे जाणून घेण्याची त्यांना प्रचंड उत्सुकता असते. सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होतो आहे. यामध्ये एक-दोन नव्हे तब्बल 3 सेलिब्रेटी दिसून येत आहेत. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो फारच जुना असल्याचं दिसून येत आहे. हा फोटो एखाद्या मेहंदी-संगीत सोहळ्या दरम्यानचा असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये तीन तारका हा सोहळा एन्जॉय करताना दिसत आहेत. हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दिसणाऱ्या त्या तीन सेलिब्रेटी गर्ल कोण आहेत? असा सर्वानांच प्रश्न पडला असेल. आम्ही तुम्हाला सांगतो या तिघी कोण आहेत. आणि हा फोटो नेमका कधीचा आहे. या फोटोमध्ये दिसणाऱ्या त्या तिघी इतर कुणी नसून दिग्दर्शिका-कोरियोग्राफर फराह खान-कुंदर, बॉलिवूड आणि हॉलिवूड स्टार प्रियांका चोप्रा आणि अभिनेत्री राणी मुखर्जी आहे. वाटलं ना आश्चर्य? सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणार हा फोटो वास्तवात फराह खानने शेअर केला आहे. फराहने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर करत एक भन्नाट कॅप्शनसुद्धा दिलं आहे.

**(हे वाचा:** Mouni Roy: काय सांगता? मौनी रॉयची हॅन्डबॅग आहे इतकी महाग, त्यात खरेदी कराल 2 बाईक ) फराहने हा फोटो शेअर करत लिहलंय, ‘फ्लॅशबॅक फ्रायडे… स्वतः च्याच संगीत सोहळ्यात नशेत असलेली नवरी डान्स करताना. सोबत प्रियांका चोप्रा आणि राणी मुखर्जी.. सोबतच फराहने म्हटलंय, दरम्यान मी माझी ओढणी, केस आणि नेकलेससुद्धा उत्तम सांभाळलं आहे’. फराहची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. या फोटोमध्ये त्या तिघी फारच वेगळ्या भासत आहेत. आफ्टर आणि बिफोर त्यांच्यात मोठा बदल दिसून येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या