छोट्या पडद्यावरील 'नागिन' अर्थातच अभिनेत्री मौनी रॉय आपल्या अभिनयासोबतच लाईफस्टाईलमुळेसुद्धा चर्चेत असते.
मौनी रॉय नेहमीच आपल्या ग्लॅमरस लुकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. अभिनेत्री लवकरच आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसोबत 'ब्रह्मास्त्र' मध्ये झळकणार आहे.
दरम्यान आता मौनी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. मौनी रॉयने नुकतंच एक छोटी हॅन्डबॅग कॅरी केली होती.
अभिनेत्री नेहमीच एक लक्झरी लाईफ जगताना दिसून येते. मौनीने काही महिन्यांपूर्वी विदेशात स्थायिक असणारा भारतीय बिझनेसमॅन सूरज नाम्बियारसोबत लग्न केलं आहे.