मुंबई, 9 जुलै- छोट्या पडद्यावरील ‘इंडियन आयडॉल’ (Indian Idol) शो नेहमीच चर्चेत असतो. बऱ्याचवेळा शोबद्दल वादविवादसुद्धा पाहायला मिळतात. मात्र तरीसुद्धा स्पर्धकांचं कौतुकही होतं. असाच एक स्पर्धक म्हणजे मोहम्मद दानिश (Mohammad Danish) होय. दानिशच्या भारदस्त आवजाने सर्वांनाचं वेड लावलं आहे. दानिश ज्यापद्धतीने रॉक गाणी गातो. त्याचंपद्धतीने तो इमोशनल गाणीसुद्धा तितक्याच बारकाईने गातो. नुकताच शोमध्ये दानिशने ‘कर हर मैदान फतेह’ हे गाणं गात एका खास महिलेला अभिवादन केलं आहे. पाहूया कोण आहे ही खास महिला.
‘सध्या इंडियन आयडॉल 12’ हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. प्रत्येक स्पर्धक आपल्या खास अंदाजाने चाहत्यांचं मन मोहून घेत आहे. या शोमधील असाच एक स्पर्धक म्हणजे मोहम्मद दानिश होय. दानिश गाणं तर उत्तम गातोच मात्र त्याला अभिनयाचीसुद्धा तितकीच आवड आहे. सेटवर नेहमीच त्याची मजामस्ती सुरु असते. दानिशला या शोमुळे मोठी लोकप्रियता मिळाली आहे. या आठवड्यात शोमध्ये दानिश आपल्या आवाजाने सर्वांनाचं मंत्रमुग्ध करणार आहे. नुकताच शोचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. (हे वाचा: Bigg Boss 15’ टीव्ही नव्हे तर या प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज; जाणून घ्या डीटेल्स ) यामध्ये दानिश ‘कर हर मैदान फतेह’ हे गाणं म्हणून सर्वांनाचं एक नवा आत्मविश्वास देत आहे. दानिशचं हे गाणं ऐकून सर्वांनाचं एक धैर्य मिळेल. येत्या आठवड्यात ‘इंडियन आयडॉल’ मध्ये ‘महिला विशेष’ भाग पाहायला मिळणार आहे. यामध्ये विविध क्षेत्रातल्या महिलांना हे स्पर्धक आपल्या गाण्यातून सलामी देणार आहेत. या भागामध्ये दानिशने हे गाणं अशाच एका खास महिलेसाठी सादर केल आहे. ही महिला म्हैसूरची राहणारी आहे. आणि ती त्याठिकाणी एका रेल्वेस्टेशनवर हमालचं काम करते. तिच्या पतीच्या निधनानंतर त्याने आपल्या पतीचं हे काम पुढ चालवलं आहे. आणि आज कष्ट करून स्वतःच्या पायावर उभी आहे. आणि त्याच्या सन्मानार्थ त्याने हे गीत सादर केल आहे. यावेळी इंडियन आयडॉलमध्ये अशाच अनेक महिलांच्या संघर्षगाथा पाहायला मिळणार आहेत.