मुंबई, 2 सप्टेंबर- छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla) अशा अचानक मृत्यूने संपूर्ण मनोरंजन विश्व हादरलं आहे. त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाला असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र तत्पूर्वी सोशल मीडियावर एका नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. सिद्धार्थच्या मृत्यूला चाहते सुशांत सिंग राजपूतच्या**(Sushant Singh Rajput**) मृत्यूसोबत जोडत आहेत. पाहूया काय आहे नेमकं प्रकरण..
सध्या सोशल मीडियावर अभिनेत्याच्या मृत्यूब्द्द्ल हळहळ व्यक्त केली जात आहे. सिद्धार्थचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सध्या चाहते शेयर करत आहेत. त्याचंप्रमाणे कूपर रुग्णालय सिद्धार्थच्या घरापासून जवळच्या अंतरावर असलेलं रुग्णालय आहे. तसेच ते एक प्रचलित रुग्णालय आहे त्यामुळे अभिनेत्याला या रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. दरम्यान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत एक आश्चर्यकारक चर्चा सुरु झाली आहे.
काही युजर्सनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं आहे, ‘सिद्धार्थची बॉडी कूपर रुग्णालयातचं का ठेवण्यात आली आहे. जेव्हा की सुशांतची बॉडीसुद्धा कूपरमध्येचं ठेवण्यात आली होती. इथं काहीतरी गूढ नक्कीचं आहे. आणि हा हृदयविकार नव्हे तर सुशांतसारखा मर्डरचं आहे. अशी धक्कादायक चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.
तसेच चाहते म्हणत आहे, आम्ही दोन उत्कृष्ट अभिनेत्यांना गमावलं आहे. मात्र या दोन्हींना कुपर रुग्णालयातचं न्हेण्यात आलं होतं. नंतर दोघांनाही मृत घोषित करण्यात आलं होत. हे साध प्रकरण नाहीय. यात नक्कीच काहीतरी गूढ आहे. असं म्हटलं जात आहे. युजर्सच्या या पोस्टमुळे सिद्धार्थच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.