JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / इमरान हाशमीच्या Video नं केला विक्रम; काही दिवसात मिळवले 5 कोटी व्ह्यूज 

इमरान हाशमीच्या Video नं केला विक्रम; काही दिवसात मिळवले 5 कोटी व्ह्यूज 

इमरान हाशमीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; व्हिडीओ पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 28 एप्रिल**:** अभिनेता इमरान हाशमी (Emraan Hashmi) हा बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्यानं आपल्या अनोख्या अभिनय शैलीच्या जोरावर बॉलवूडमध्ये स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचा प्रत्येक चित्रपट हा काही सुपरहिट होत नाही पण त्याच्यावर फ्लॉप चित्रपटाचा शिक्काही बसत नाही. यावरुनच इमरानच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. दरम्यान त्याचं एक नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. (Emraan Hashmi new song) अन् आश्चर्याची बाब म्हणजे या गाण्यानं काही दिवसांतच तब्बल पाच कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. इमरानच्या या नव्या गाण्याचं नाव लुट गये (Lut Gaye) असं आहे. नुकतंच हे गाणं युट्यूबर प्रदर्शित केलं गेलं. या गाण्यात अभिनेत्री युक्ती तऱ्हेजा (Yukti Thareja) हिनं इमरानच्या प्रेयसीची भूमिका साकारली आहे. दोघांचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडला आहे. हे गाणं सध्या वाऱ्यासारखं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या गाण्यानं केवळ 60 दिवसांत युट्यूबवर तब्बल पाच कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. इतके व्ह्यूज मिळवणारा हा भारतातील मोजक्या व्हिडीओंपैकी एक ठरला आहे. अवश्य पाहा - प्रियांका चोप्रामुळं माझं करिअर संपलं; बहिणीनंच केला खळबळजनक आरोप

टी सीरीजनं (T-Series) या गाण्याची निर्मिती केली आहे. हे गाणं झुबिन नौटियाल यांनी गायलं आहे. या गाण्याचे स्वर मनोज मुंताशीर यांनी लिहिले असून तनिष्क बागची यांनी गाण्याला संगीतबद्ध केलं आहे. ‘लूट गये’ अलीकडेच मोठ्या संख्येने व्हूज मिळवत सर्वांच्या आवडत्या गाण्यांपैकी एक बनले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या