JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Disha Vakani News: दयाबेन सिरीयल सोडण्याचं खरं कारण आलं समोर, दिशाच्या पतीने केलेल्या विचित्र मागण्या आहेत का मेकर्सच्या डोकेदुखीचं कारण?

Disha Vakani News: दयाबेन सिरीयल सोडण्याचं खरं कारण आलं समोर, दिशाच्या पतीने केलेल्या विचित्र मागण्या आहेत का मेकर्सच्या डोकेदुखीचं कारण?

तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेत दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिला नुकताच मुलगा झाला असून तिच्या मालिकेत परत येण्याबद्दल आता एक नवीन माहिती समोर आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 24 मे: तारक मेहता का उलट चष्मा (taarak mehta ka ooltah chashmah) या लोकप्रिय मालिकेतून दयाबेन जेठालाल (dayaben jethalal) ही जोडी प्रेक्षकांच्या समोर आली आणि प्रेक्षकांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केलं. या मालिकेत दिशा वकानी (Disha Vakani) दयाबेनचं पात्र साकारत होती. दिशा 2017  पासून या सिरियलमधून गायब (disha wakani lft taarak mehta serial) आहे. तिने सिरीयल सोडल्याची बातमी खरी आहे यावर आता जवळपास सर्व प्रेक्षकांचा विश्वास बसला आहे. मात्र यामागचं खरं कारण तिच्या  केलेल्या मागण्या आहेत का? असा प्रश्न आता पडतो आहे. दिशा 2017 मध्ये एका कन्यारत्नाला जन्म देत आई झाली होती. तेव्हा तिने मॅटर्निटी लिव्ह घेतली असल्याने ती सिरियलपासून लांब होती. काही महिन्यांनी ती सीरियलमध्ये येईल अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र त्यानंतर दिशाची अर्थात लाडक्या दयाबेनची पुन्हा एंट्री झालीच नाही. ती परत येणार असल्याच्या बातम्या दर काही दिवसांनी येत होत्या पण दिशाची दिशा नक्की कुठे चुकली हे समजलं नाही. तिला परत आणण्यासाठी बरेच प्रयत्न निर्मात्यांकडून करण्यात आले होते पण दिशा पुन्हा मालिकेत दिसली नाही.असं म्हणलं जात आहे की दिशाच्या  पतीने केलेल्या मागण्यांमुळे दिशाला परत आणण कठीण गेलं. वाचा- जान्हवी कपूरच्या May महिन्यातील ग्लॅमरस फोटोंची गॅलरी; पाहा फक्त एका क्लिकवर काय होत्या दिशाच्या पतीच्या मागण्या? दिशाने 2015  मध्ये मयूर पंड्या नावाच्या सीए सोबत लग्नगाठ बांधली. 2017साली तिने गोंडस मुलीला जन्म दिला होता. मुलीच्या जन्माच्या वेळी सुट्टीवर असलेल्या दिशाला परत सिरीयलमध्ये आणण्यासाठी मेकर्सनी पुढाकार घेतल्यावर दिशाच्या पतीने अनेक मागण्या निर्मत्यांसमोर ठेवल्या होत्या अशी आली होती .या मागण्यांनुसार दिशाला एका एपिसोडचे दीड लाख रुपये मिळावे, दिशा दिवसातून फक्त ३ तास कामासाठी देईल, तिच्या मुलींसाठी सेटवर नर्सरी उपलब्ध असावी आणि एक नॅनी पूर्ण वेळ सेटवर असावी अश्या मागण्या दिशाच्या पतीने केल्या होत्या.  मेकर्सने या  मागण्या मान्य केल्या नाहीत आणि त्यामुळेच बहुधा दिशाची परत येण्याची चिन्ह नाही आहेत. तिची रिप्लेसमेंट केली जाणार अशीही एक माहिती समोर आली होती. हे ही वाचा- Good News! ‘तारक मेहता..’ मालिकेतील दयाबेन दुसऱ्यांदा झाली आई, दिशा वकानीला पुत्ररत्न प्राप्त दिशाच्या नसण्याने प्रेक्षकांना अधुरं वाटत आहे हे मात्र नक्की. जेठालाल दयाबेन या लोकप्रिय जोडीने अनेक वर्ष सगळ्यांना पोट धरून हसवलं आहे. जुन्या एपिसोडमधल्या दयाबेनला बघून आता समाधान मानावं लागत आहे. दिशाने जवळपास 9 वर्ष तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेमध्ये आपली भूमिका नेटाने बजावली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या