JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / देवमाणूस सध्या काय करतोय? फौजी वेशात नव्या भूमिकेसाठी सज्ज, चाहत्यांमध्ये उत्सुकता

देवमाणूस सध्या काय करतोय? फौजी वेशात नव्या भूमिकेसाठी सज्ज, चाहत्यांमध्ये उत्सुकता

‘देवमाणूस’ म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड (Kiran Gaikwad) सध्या त्याच्या सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे. याशिवाय तो नव्या भूमिकेसाठीही सज्ज असल्याचं पाहायला मिळत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 21 ऑगस्ट : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील प्रचंड लोकप्रिय ‘देवमाणूस’ (Devmanus) मालिकेने काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिकेने निरोप घेतला असला तरीही प्रेक्षक मालिकेला फारच मिस करताना दिसत आहेत. तर मालिकेच्या दुसऱ्या सीझनचीही चर्चा रंगू लागली आहे. पण मालिकेतील देवमाणूस म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड (Kiran Gaikwad) सध्या त्याच्या सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे. याशिवाय तो नव्या भूमिकेसाठीही सज्ज असल्याचं पाहायला मिळत आहे. मालिकेत किरणने खलनायकाची भूमिका साकारली होती. मात्र हे पात्र प्रचंड लोकप्रिय झालं होतं. तर या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं होतं. पण आठवड्याभरापूर्वीच मालिका संपल्यानंतर किरण आता पुन्हा एकदा कामाला सुरूवात करत असल्याचं पाहायला मिळत आहे. याशिवाय तो सुट्ट्यांचा आनंदही घेत आहे.

किरणने काही रील्स व्हिडीओ देखील शेअर केले आहेत. ज्यात तो सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहेत. याशिवाय त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी देखील शेअर केली आहे. ज्यात तो फौजी वेशात दिसत आहे. व समथिंग कुकींग असं कॅप्शनही त्याने दिलं आहे. त्यामुळे किरण नव्या भूमिकेत दिसणार असल्याचं समजत आहे. पण अद्याप हा चित्रपट आहे की मालिका हे स्पष्ट झालं नाही. व नक्की कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसणार हे देखील त्याने सांगितलेलं नाही.

मलिष्काला हवीये नीरज चोप्राकडून ‘जादू की झप्पी’; RJ च्या या मुलाखतीमुळे संतापले युजर्स

देवमाणूस मालिकेतील खलनायकाच्या भूमिकेने त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली. एका खऱ्याखुऱ्या गुन्हेगाराची भूमिका त्याने साकारली होती. अल्पावधीतच ही मालिका लोकप्रिय ठरली होती. तर आता प्रेक्षकांना दुसऱ्या भागाची उत्सुकता लागली आहे. याआधी किरण लागीरं झालं जी मालितकेत खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या