JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / श्रीलंकेहून परतताच 'या' अभिनेत्रीला धोकादायक व्हायरसची लागण; चिमुकल्या लेकींपासून राहावं लागतंय दूर

श्रीलंकेहून परतताच 'या' अभिनेत्रीला धोकादायक व्हायरसची लागण; चिमुकल्या लेकींपासून राहावं लागतंय दूर

नुकतीच छोट्या पडद्यावरील एक अभिनेत्री श्रीलंकेला गेली होती. मात्र आता तिच्याविषयी एक काळजी वाढवणारी बातमी समोर आली आहे. ही अभिनेत्री श्रीलंकेहून परतताच तिला इन्फ्लुएंझा बी या व्हायरसची लागण झाली आहे.

जाहिरात

देबिना बॅनर्जी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

 मुंबई, 01 मार्च : आपण सगळे कोरोना व्हायरसच्या विळख्यातून बाहेर पडलो असलो तरी श्रीलंकेत सध्या एक व्हायरस धुमाकूळ घालत आहे. या व्हायरसचं नाव  इन्फ्लुएंझा बी असं आहे. श्रीलंकेत अनेक लोक या व्हायरसची शिकार होत आहेत. नुकतीच छोट्या पडद्यावरील एक अभिनेत्री श्रीलंकेला गेली होती. मात्र आता तिच्याविषयी एक काळजी वाढवणारी बातमी समोर आली आहे. ही अभिनेत्री श्रीलंकेहून परतताच तिला इन्फ्लुएंझा बी या व्हायरसची लागण झाली आहे. तिने सोशल मीडियावरून चाहत्यांसोबत ही बातमी शेअर केली आहे. टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जी छोट्या पडद्यापासून दूर असली तरी तिचं फॅन फॉलोइंग जबरदस्त वाढली  आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून तिच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता या अभिनेत्रीशी संबंधित एक बातमी समोर येत आहे, जी ऐकून चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. देबिना बॅनर्जी हिला इन्फ्लुएंझा बी व्हायरसची लागण झाली आहे. Zwigato Trailer: सगळ्यांना हसवणारा कपिल शर्मा ‘या’ भूमिकेतून रडवणार; झ्विगाटोचा ट्रेलर तुम्हालाही करेल इमोशनल देबिना बॅनर्जी नुकतीच कुटुंबासह श्रीलंकेला गेली होती. श्रीलंकेहून परत आल्यानंतर काही दिवसांपासून ती आजारी पडली होती. तपासणी केल्यानंतर तिला या व्हायरसचा संसर्ग झाल्याचे समजले. मात्र, तिचा पती आणि अभिनेता गुरमीत चौधरी आणि त्यांच्या दोन मुली लियाना आणि दिविशा यांना संसर्ग झालेला नाही. त्या सुखरूप आहेत. मात्र ही अभिनेत्री सध्या आजारी पडली आहे.

देबिनाने सोशल मीडियावर  याबाबत माहिती दिली आहे. तिने लिहिलंय कि, “मला तुम्हाला सांगायचंय कि मला  इन्फ्लुएंझा बी व्हायरसची लागण झाली आहे. पण मी आता त्यातून हळूहळू  बरी होत आहे. मी योग्य खबरदारी घेत आहे आणि निरोगी खात आहे. मुलांपासून दूर राहून मी स्वतःची काळजी घेत आहे. मी लवकरच बरी होऊन पुन्हा परत येईल.’ असं तिने म्हटलं आहे. देबिनाचे चाहते ती लवकर बरी होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

देबिना नुकतीच आई झाली आहे. वर्षाच्या आतच तिने दुसऱ्या मुलीला जन्म दिला. त्यामुळे सध्या आपल्या लेकींपासून तिला दूर राहावं लागत आहे. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने देबिना बॅनर्जी पती गुरमीत चौधरी आणि मुली आणि आईसोबत श्रीलंकेला गेल्या होत्या. देबिना आणि गुरमीत यांची त्यांच्या मुलींसोबतची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय सहल होती. ‘रामायण’मध्ये सीतेची भूमिका साकारणाऱ्या देबिनाने श्रीलंकेत आपल्या कुटुंबासोबत खूप मजा केली, ज्याची एक झलक तिने तिच्या व्लॉगद्वारे चाहत्यांना दाखवली. सध्या त्याचे चाहते लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या