मुंबई 26 जून: हृता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि उमेश कामत (Umesh Kamat) यांच्या सुपरहिट भावाबहिणीची जोडी असलेलं एक नाटक म्हणजे (Dada Ek Good News Aahe) ‘दादा एक गुड न्यूज आहे’. या नाटकाने सगळ्या नाट्यरसिकांना वेड लावलं आहे. या नाटकाचा हटके विषय आणि त्याची अप्रतिम मांडणी यामुळे हे नाटक अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या आवडीचं नाटक बनलं. आज या नाटकाकडे सुद्धा खूप मोठी good news आहे. या नाटकाचा आज 250 वा प्रयोग सादर केला जाणार आहे. डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले रंगमंदिरात हा प्रयोग होणार आहे. या नाटकाच्या 250 व्या प्रयोगाची सगळ्यांचाच उत्सुकता आहे. मन्या आणि विनीत या भावाबहिणींमधलं एक गोड आणि निखळ नातं फुलवत नेणारी या नाटकाची कथा अगदी आजच्या तरुणाईला सुद्धा कनेक्ट करणारी आहे. यात हृता दुर्गुळे, उमेश कामत, आरती मोरे, आशुतोष गोखले असे मुख्य कलाकार असून प्रिया बापट या नाटकाची निर्माती आहे. हे नाटकं कल्याणी पाठारे या लेखिकेने लिहिलं असून याच दिग्दर्शन अद्वैत दादरकरने केलं आहे. या नाटकाच्या प्रयोगाची उत्सुकता एवढी आहे की यातील कलाकार सुद्धा आपल्या 250 व्या प्रयोगाचा प्रवास आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवत आहेत. या नाटकात मिथिला हे पात्र करणाऱ्या आरती मोरे (Aarti More) या अभिनेत्रीने नुकताच एक विडिओ शेअर करत आज ती 250 व्या वेळेला मिथिला पात्राची वेशभूषा करत आहे अशी आनंदाची बातमी तिने प्रेक्षकांना दिली.
या नाटकामुळे हृता आणि उमेश यांच्या सुंदर अभिनयकौशल्यातून आपल्याला भावाबहिणींचं नातं त्यातले कंगोरे तर समजलेच त्यासोबतच एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर भाष्य सुद्धा हे नाटक करत असल्याने प्रेक्षकांनी आवर्जून नाटकाला भरभरून प्रतिसाद दिला.
या नाटकाचे अनेक शो हाऊसफुल जात असतात. हृता दुर्गुळे या अभिनेत्रीचं हे पहिलं नाटक असून पहिल्याच नाटकात बाउंड्री बाहेर सिक्सर मारत ती खट्याळ मन्याची भूमिका उत्तमपणे साकारते. नाटक आणि रंगभूमीवर रुळलेला अभिनेता उमेश कामत त्याच्या अनोख्या अंदाजात तुफान बॅटिंग करताना दिसतो. हे ही वाचा- Maha Minister: आता काही खरं नाही! फायनलमध्ये पोहोचलेल्या वहिनी घेतात भन्नाट उखाणे, पाहा video
या नाटकाचं जबरदस्त प्रमोशन होर्डिंग लावून करण्यात आलं होतं. पुणे मुंबई सारख्या शहरात सगळीकडे मोठमोठ्या होर्डिंगवर ‘दादा मी प्रेग्नेंट आहे’ असा मजकूर पाह्यला मिळत होता. या नाटकासाठी आखलेली ही प्रमोशनल स्ट्रॅटेजी होती जी उत्तम पद्धतीने चालली. या नाटकाबद्दल अनेक कलाकारांनी सुद्धा आपलं मत व्यक्त करत हे नाटक जरूर पाहावं असं म्हणलं आहे.