JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'RRR' मधील गाण्याच्या हुक स्टेप पाहून आमिरला फुटला घाम ; म्हणाला, आपल्याला न्हाय जमणार!

'RRR' मधील गाण्याच्या हुक स्टेप पाहून आमिरला फुटला घाम ; म्हणाला, आपल्याला न्हाय जमणार!

एस. एस. राजमौली यांच्या ‘आरआरआर’ (RRR) सिनेमाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. याला आमिर खानने देखील हजेरी लावली होती. यावेळीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 मार्च- एस. एस. राजमौली यांचा ‘आरआरआर’ (RRR) सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या सिनेमाचे ज्यूनियर एनटीआर (Jr NTR) आणि राम चरण (Ram Charan) जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. सिनेमाच्या प्रमोशनासाठी सर्व स्टारकास्ट दिल्लीत पोहचली असता, तिथं त्यांच्यासोबत आमिर खान (Aamir Khan) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) देखील त्यांच्यासोबत हजेरी लावली. यावेळी स्टेजवर आमिर खानने ज्यूनियर एनटीआर (Jr NTR) आणि राम चरण (Ram Charan) तसेच आलिया सोबत खूप मस्ती केली. आमिर खान या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा होता. यावेळी आमिर खानला ज्यूनियर एनटीआरने (Jr NTR) आरआरआर’ (RRR) सिनेमातील नाटू नाटू या गाण्याची हुक स्टेप शिकवली. मात्र या गाण्याची स्टेप पाहून आमिर म्हणाला की, आपल्याला काय ह जमणार नाही. यानंतर लगेच मागून आलिया भट्ट म्हणते की, एवढं काय नाही, खूप साध्या स्टेप्स आहेत. मी देखील केल्या होत्या.यानंतर पुन्हा एकदा ज्यूनियर एनटीआर आणि रामचरण आमिर खानला स्टेप्स शिकवतात. यावेळी त्यांचा ठेका पकडण्याचा आमिर खान प्रयत्न करतात.

संबंधित बातम्या

सध्या या डान्सची क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण स्टारर हा चित्रपट 25 मार्च 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. ज्यात आलिया भट्टशिवाय अजय देवगणची देखील प्रमुख भूमिका आहे. एस.एस. राजामौली यांचा मल्टीस्टारर हा चित्रपट 400 कोटींच्या बजेटवर तयार करण्यात आला आहे.  राजामौली यांच्या आरआरआर(RRR) या सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून चाहते प्रतिक्षा करत होते. सुरुवातीला कोरोनामुळे या सिनेमाचं प्रदर्शन लांबलं. परंतु आता प्रेक्षकांना जास्त काळ वाट पाहण्याची गरज नाही. वाचा- ‘तू तेव्हा तशी’ मधील अभिनेत्री आहे प्रसिद्ध अभिनेत्याची मुलगी, बहीण देखील… या सिनेमाचं कथानक क्रांतिकारी अल्लूरी सीताराम राजू आणि कोमाराम यांच्या भोवती फिरतं. ज्यांनी ब्रिटीश काळात आणि हैदराबाद निजामांविरोधात लढाई लढली होती. सिनेमात एनटीआरला कोमाराम भीम आणि अभिनेता रामचरणला अल्लूरी सीतारामची भूमिका दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या