मुंबई, 25 मार्च: बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor pregnancy) लवकरच आई होणार आहे. अभिनेत्री आणि तिचे पती आनंद अहूजा (Anand Ahuja) आता त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत करण्यास उत्सुक आहेत. सोनमने 21 मार्च 2022ला ही आनंदाची गोष्ट आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली. पण आता एका मुलाखतीदरम्यान तिने आपलं गरोदरपण आणि त्यात येणाऱ्या समस्यांविषयी मोकळेपणाने सांगितलं. सोनम म्हणाली, ‘पहिले तीन महिने फारच कठीण होते. ज्यासाठी माझी अजिबातच तयारी झालेली नव्हती. या तीन महिन्यांत तिने आपलं आरोग्य चांगलं राखण्यावर आणि निरोगी राहण्यावर भर दिला.’ लग्नानंतर 4 वर्षांनंतर सोनम आता आई होणार आहे. तिने 2018मध्ये व्यावसायिक आनंद अहूजा यांच्याशी लग्न केलं होतं. लग्नानंतर ती आपल्या चित्रपटांपेक्षा फॅशन सेन्समुळे जास्त चर्चेत राहिली आहे. ती अनेकदा सोशल मीडियावर आपले पती आनंदसोबत सुंदर रोमँटिक फोटो पोस्ट करत असते. जे तिच्या चाहत्यांना खूपच आवडतात. आता मात्र दोघे वैवाहिक जीवनातील पुढच्या टप्प्याकडे जात आहेत. ही 36वर्षीय अभिनेत्री आता आई होणार आहे. सध्या ती 4 महिन्यांची गरोदर आहे. हे वाचा -‘माझ्या आयुष्यातील सर्वात रोमांचक भूमिकेसाठी तयारी करतोय’, बॉलिवूडचा चिरतरुण अभिनेता होणार आजोबा सोनमने स्वत:चं आरोग्य कसं सांभाळलं? ‘व्होग इंडिया मॅगझिन’मधील एका मुलाखतीत सोनमने गरोदरपणाच्या सुरूवातीच्या दिवसांत आपलं आरोग्य कसं सांभाळलं याबद्दल मोकळेपणानं गप्पा मारल्या. त्यावेळचा तिचा आरोग्यपूर्ण आहार आणि दिनक्रम या विषयी ती बोलली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनमनी सांगितलं की, योग्य आहार आणि व्यायाम करण्याऐवजी तिने स्वत:ला हेल्दी बनवण्यावर जास्त लक्ष दिलं. तिच्या गरोदरपणानेच तिला हा आरोग्यपूर्ण मार्ग दाखवला. ती म्हणते, जर तुम्ही आणखी एका जीवाला आपल्या पोटात वाढवत असाल तेव्हा तुम्ही आधी स्वत:ला सन्मान द्यायला शिकलं पाहिजे.
गरोदरपणातील पहिले तीन महिने होते कठीण सोनम म्हणाली, ‘गरोदरपणातील पहिले तीन महिने कठीण होते. गरोदर असणं, पोटात एक जीव वाढवणं सोपं नाही. सुरूवातीला माझी यासाठी तयारी नव्हती. हे खरंच कठीण होतं कारण सगळे सांगतात की, गरोदर असणं ही किती महत्त्वाची बाब आहे, मोठी बाब आहे पण त्यावेळी येणाऱ्या समस्या आणि अडचणींबद्दल कुणीच सांगत नाही. म्हणूनच कदाचित स्रीच्या आयुष्यातील या काळाला तिचा दुसरा जन्म असं म्हटलं जात असावं.’ हे वाचा- PHOTOS: प्रग्नेन्सीच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच दिसली सोनम कपूर, बेबी बम्पही केला फ्लॉन्ट बॉलिवूड अभिनेत्रींचे सिनेमे चर्चेत असतात तसंच त्यांचं गरोदरपणही चर्चेत असतं. सध्या त्या आपल्या भावना सोशल मीडियातून व्यक्त करतात. त्यांच्या चाहत्यांनाही त्यात रस असतो. सोनमचं बाळंतपण व्यवस्थित व्हावं असं जसं तिच्या आणि अहूजा कुटुंबीयांना वाटत असेल तसंच तिच्या चाहत्यांनाही नक्कीच वाटत असेल.