JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / शाहरुखच्या ‘पठान’मध्ये सलमानसुद्धा झळकणार; VIDEO होतोय VIRAL

शाहरुखच्या ‘पठान’मध्ये सलमानसुद्धा झळकणार; VIDEO होतोय VIRAL

या दोघांना शेवटचं एकत्र ‘जीरो’ या शाहरुखच्या चित्रपटात पाहण्यात आलं होतं. त्यामध्ये सलमानने कॅमियो केला होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 ऑगस्ट-  बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि शाहरुख खान (Shahrukh Khan) यांची मैत्री जगजाहीर आहे. दोघेही बॉलिवूडचे तगडे कलाकार आहेत. दोघांमध्ये मध्यंतरी दुरावा आला होता. मात्र आत्ता पुन्हा एकदा सर्वकाही ठीक होताना दिसत आहे. कित्येक दिवसांपासून या दोघांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. हे दोन मोठे कलाकार एकत्र येणं म्हणजे चाहत्यांसाठी मेजवानीच असते. आत्ता लवकरच त्यांची ही प्रतीक्षा संपणार आहे.

संबंधित बातम्या

या दोघांना शेवटचं एकत्र ‘जीरो’ या शाहरुखच्या चित्रपटात पाहण्यात आलं होतं. त्यामध्ये सलमानने कॅमियो केला होता. या दोघांना कित्येक वर्षांनंतर एकत्र पाहून चाहते जाम खुश झाले होते. त्यांनतर आत्ता पुन्हा एकदा चाहत्यांना ही मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. शाहरुख खानच्या आगामी ‘पठान’ या चित्रपटात सलमान खान कॅमियो करणार आहे. त्यामुळे या दोघांचे चाहते खुपचं खुश झाले आहेत. (हे वाचा: पठान’ ते ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटांसाठी कलाकारांना मिळालं आहे भरमसाठ मानधन   ) तसं पाहायला गेलं तर, याची घोषणा सलमान खानने एका वर्षापूर्वीचं केली होती. सलमानने ‘बिग बॉस 14’ मध्ये ही गोष्ट जाहीर केली होती. त्यानुसार सलमान खान शाहरुखच्या चित्रपटात कॅमियो करणार आहे. सलमान खानचा बिग बॉसमधील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये सलमान खान याबद्दलची घोषणा करताना दिसत आहे. (हे वाचा: दीपिका पादुकोण साकारणार द्रौपदी? ‘या’ चित्रपटाची होतेय निर्मिती ) या व्हिडीओमध्ये सलमान खान म्हणत आहे, ‘जिंदगी पुढ चालत राहणार. शोसुद्धा चालू राहणार. हा शो संपला तर आपण पठानमध्ये भेटणार, टायगर 3 मध्ये भेटणार आणि परत 8 महिन्यांनंतर बिग बॉस 15 मध्ये भेटूचं’. सध्या बिग बॉस 15 OTT सुरु झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या