JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देतेय महिमा चौधरी, अनुपम खेर यांनी शेअर केला इमोशनल VIDEO

ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देतेय महिमा चौधरी, अनुपम खेर यांनी शेअर केला इमोशनल VIDEO

टीव्ही अभिनेत्री छवी मित्तलनंतर आता बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीने ब्रेस्ट कॅन्सरसोबत (Breast Cancer) यशस्वी लढा दिला आहे. महिमा चौधरीने (Mahima Chaudhary) आपण ब्रेस्ट कॅन्सरमधून मुक्त झाल्याची माहिती अभिनेते अनुपम खेर यांच्यासोबत मिळून दिली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 9 जून-  टीव्ही अभिनेत्री छवी मित्तलनंतर आता बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीने ब्रेस्ट कॅन्सरसोबत   (Breast Cancer)  यशस्वी लढा दिला आहे. महिमा चौधरीने   (Mahima Chaudhary)  आपण ब्रेस्ट कॅन्सरमधून मुक्त झाल्याची माहिती अभिनेते अनुपम खेर यांच्यासोबत मिळून दिली आहे. अनुपम खैर   (Anupam Khair)  यांनी एक व्हिडीओ शेअर करत महिमाला आपला ‘हिरो’ असं संबोधलं आहे. अभिनेत्री सध्या बरी होऊन सेटवर परतल्याचं उघड झालं आहे. वय हा केवळ एक आकडा आहे असं म्हटलं जातं. हे अनुपम खेर यांच्याबाबतीत तंतोतंत लागू होतं. या वयातसुद्धा अनुपम खेर प्रचंड ऍक्टिव्ह आहेत. ते सतत विविध चित्रपट, वेबसीरिजमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. तसेच अभिनेते अनुपम खेर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत विविध विषयांवर आपलं मत व्यक्त करत असतात. किंवा अनेक लक्षवेधी पोस्ट करत असतात. आजसुद्धा असंच काहीसं झालं आहे. अभिनेते अनुपम खेर यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ तब्बल साडे सात मिनिटांचा आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री महिमा चौधरी आहे. अभिनेत्री यामध्ये बाल्ड लुकमध्ये दिसत आहे. अभिनेत्री गेल्या काही महिन्यांपासून ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत होती.शस्त्रक्रियेदरम्यान तिचे गेले आहेत. सध्या अभिनेत्रीने ब्रेस्ट कॅन्सरवर यशस्वी मात केली आहे. ती या व्हिडीओमधून आपली रिकव्हर जर्नी सांगताना दिसून येत आहे.

संबंधित बातम्या

महिमा गेल्या अनेक दिवसांपासून विग लाऊन फोटोशूट करत आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना तिच्या या अवस्थेचा अंदाज नाही आला. अनुपम खेर यांनी पोस्ट लिहित म्हटलंय, ’’ मी महिमा ला माझ्या 525 व्या चित्रपट #TheSignature मध्ये अतिशय महत्वाची भूमिका साकारण्यासाठी एक महिना आधी US मधून कॉल केला होता.तेव्हा ती मला म्हणाली मी करेन पण तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागेल. तेव्हा मी तिला म्हणालो नाही मी आणखी थांबू शकत नाही. तू मला वाट पाहायला का सांगत आहेस. तेव्हा मी तिला विचारलं तुझ्या घरात इतका गोंधळ कसा सुरु आहे. नेमकं काय सुरु आहे तिथे. तेव्हा तिच्यावर ब्रेस्ट कॅन्सरची ट्रीटमेंट सुरु होती. आणि त्यामुळे तिचे केस गेले होते. घरात तिच्या आजूबाजूला सर्व नर्सेस होत्या. तिला रडू कोसळलं आणि तिने मला या सर्व परिस्थितीबाबत सांगितलं’. तेव्हा मी तिला म्हटलं तु असंही काम करु शकतेस. तुला विग लावण्याची काहीच गरज नाही. तुला सर्वकाही शक्य आहे. त्यांनतर महिमाने होकार दिला’. **(हे वाचा:** ..म्हणून या अभिनेत्रीवर नाही घरच्यांचा विश्वास; या सवयीमुळे सतत करतात चिंता ) महिमा रेग्युलर चेकअपसाठी नेहमीच डॉक्टरकडे जाते. यादरम्यान तिच्या स्क्रीनिंगमध्ये काही अडचण वाटली. आणि त्यामुळेच तिची तपासणी करण्यात अली आणि तेव्हा तिला काही प्रमाणत ब्रेस्ट कॅन्सरची सुरुवात झाल्याचं दिसून आलं. त्यांनतर लगेचच तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले. आता ती यामधून पूर्णपणे बरी झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या