मुंबई, 20 ऑगस्ट: बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) आपल्या उत्तम अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. चाकोरीबद्ध चित्रपटांपेक्षा चांगल्या आगळ्यावेगळ्या विषयांवरील चित्रपटांना प्राधान्य देत तिनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सुरुवातीला भूमीनं आपल्या शारीरिक सौंदर्यापेक्षा कसदार अभिनयावर लक्ष केंद्रित केलं आणि सकस अभिनयाच्या जोरावर तिनं बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. अलीकडच्या काळात मात्र तिनं स्वतःच्या रुपात, शरीरयष्टीत जबरदस्त परिवर्तन घडवून आणलं असून, कमनीय सुडौल बांध्यानं ती आता बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्रींनाही टक्कर देत आहे. आजकाल भूमी आपले आकर्षक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सोशल मीडियाद्वारे ती तिच्या चाहत्यांना व्यावसायिक जीवनातील अपडेट्सही देत असते. अलीकडेच तिने एक फोटो शेअर केला होता, जो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं म्हटलं होतं की, मनानं ती कोणत्यातरी बीचवर आहे. त्यापाठोपाठ आता भूमीनं ब्राऊन बिकीनीमधील (Brown Bikini) हॉट फोटो शेअर केला आहे. हा एखाद्या बीचवरचा फोटो असल्याचा अंदाज आहे. उन्हांपासून बचावासाठी तिनं ब्राऊन कलरचीच हॅट घातलेली दिसते. या बिकिनीमध्ये तिची टोन्ड बॉडी फ्लाँट होत आहे. तिने गुलाबी लिपस्टिक लावलं असून, ती अतिशय आकर्षक दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, आतापर्यंत या फोटोला 16 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.
भूमीने या फोटोच्या कॅप्शनमध्ये Enroute Paradise असं लिहिलं आहे पण तिनं नेमकं कुठलं ठिकाण आहे ते सांगितलेलं नाही. तिनं या पोस्टमध्ये लोकेशन टॅग केलेलं नाही. मात्र ती नक्कीच कुठल्यातरी बीचवर असल्याचा अंदाज बांधण्यात येतो आहे. भूमीच्या या हॉट फोटोवर बॉलिवूडमधील अभिनेत्री, सेलेब्रिटिजनी कमेंटस करून तिच्या लूकचे कौतुक केले आहे. यात कियारा अडवाणी, ताहिरा कश्यप आदींचा समावेश आहे. भूमी सध्या अनेक प्रकल्पांमध्ये व्यस्त आहे. त्यामुळं कामाचा ताण कमी करण्यासाठी तिनं शूटिंगमधून ब्रेक घेतला असून ती बीचवर सुट्टी साजरी करत आहे. भूमी अक्षय कुमारसोबत (Akshay kumar) ‘रक्षा बंधन’ या चित्रपटात ती दिसणार आहे. आनंद एल राय या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. भूमीने या पूर्वी अक्षय कुमारसोबत ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या चित्रपटात काम केलं आहे. त्याचबरोबर ती शशांक खेतान दिग्दर्शित ‘मिस्टर लेले’ या चित्रपटात वरुण धवन आणि कियारा अडवाणीसोबत दिसणार आहे. यापूर्वी भूमीने शशांक खेतान यांच्या ‘भूत: द हॉन्टेड शिप’ या चित्रपटात काम केलं आहे.